Breaking newsआर्थिक घडामोडीमहाराष्ट्र राज्यराजकीय

योद्धा एक्सप्रेस न्यूज!! आता ३ हजारात मिळणार ‘फास्टॅग पास’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषण

प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

YVCM हेल्पिंग फाउंडेशन एनजीओ संचालित योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाळ नाशिक

 प्रतिनिधी किरण पाटील मामा

‘फास्टॅग’वर आधारित वार्षिक पास देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केली. येत्या १५ ऑगस्ट २०२५ पासून ३ हजार रुपये किमतीचा ‘फास्टॅग’ आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येणार आहे. हा पास सुरू होण्याच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत किंवा २०० ट्रिप यापैकी जे पहिले असेल तोपर्यंत तो वैध राहणार आहे.

हा पास केवळ गैरव्यावसायिक खासगी वाहनांसाठी (कार-जीप-व्हॅन आदी) विशेष रुपात तयार करण्यात आला आहे. तो देशभरातील राष्ट्रीय महामार्गवर चालणार आहे. वाषिक पाससाठी लवकरच महामार्ग ॲप आणि ‘एनएचएआय’च्या संकेतस्थळावर एक स्वतत्र लिंक उपलब्ध केली जाणर आहे. ज्यामुळे पास उपलब्धता अधिक सुलभ होणार आहे.

यामुळे टोल नाक्यावर होणारी वाहनांची गर्दीही कमी होईल तसेच विविध कारणांमुळे नाक्यांवर होणारे वादही कमी होतील, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ही योजना फक्त खासगी (नॉन-कमर्शियल) वाहनांसाठी उपलब्ध असेल. पास एकदा सक्रिय केल्यावर तो एक वर्ष किंवा २०० प्रवासांपर्यंत, यापैकी जे आधी संपेल, तेवढ्यासाठीच वैध असेल.

पास कसा काढायचा?

वार्षिक पास सक्रिय करण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी एक स्वतंत्र लिंक लवकरच ‘हायवे ट्रॅव्हल अॅप’ आणि ‘एनएचएआय – एमओआरटीएच’ वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिक ही लिंक सुरू झाल्यानंतर या अधिकृत अॅपद्वारे हा पास ‘अ‍ॅक्टिव्हेट’ करू शकतील. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट्सवरूनही पास मिळवता येईल.

 👇 सारथी योद्धा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत 👇

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button