योद्धा एक्सप्रेस न्यूज!!नाशिक-कळवण रस्त्यावर भीषण अपघात, सहाजण ठार !
श्री हरिश चव्हाण प्रतिनिधी नासिक, बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 9850524700

योद्धा एक्सप्रेस न्यूज!!नाशिक-कळवण रस्त्यावर भीषण अपघात, सहाजण ठार !
नामपूर : नाशिक येथील नातेवाईकांचा लग्नसोहळा आटोपून परतणाऱ्या कारचा कळवणजवळ भीषण अपघात झाला. नामपूर येथील बधान कुटुंबीयांची कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाशिक-कळवण रस्त्यालगत कोल्हापूर फाट्याजवळ एका बंगल्यावर आदळली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह सहा जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ४) रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. दोन्ही जखमींना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या वृत्तांमुळे नामपूर शहरावर शोककळा पसरली आहे.
नामपूर येथील बधान कुटुंबीय नाशिक येथे नातेवाईकाच्या लग्नसोहळ्यासाठी गेले होते. सोहळा आटोपून सटाणा येथे परतत असताना कार (क्र. एमएच ४१ बीई ५४४३) चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार विठोबा शंकर अहेर यांच्या बंगल जाऊन आदळली. ही धडक जबरदस्त होती की, बंगल्याबाहेर असलेला सिमेंटचा खांबही वाकला गेला. अपघातामध्ये शैला वसंत बधान ( वय ६२), त्यांची जाऊ सरला भालचंद्र भदाण (५०), चालक खालिक मेहमूद पठाण (५०) रा. नामपूर, ता. सटाणा तसेच माधवी मेतकर (वय ३२) आणि त्यांची मुलगी त्रिष्णा मेतकर (वय ५) उत्कर्ष मेतकर (वय १२)
रा. देवळा हे ठार झाले. तर भालचंद्र बधान (वय ५२) रा. नामपूर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतांत शैला बधान व माधवी मेतकर या मायलेकी नून, त्रिवेणी ही माधवी यांची मुलगी आहे. या अपघातामुळे बधान आणि मेतकर कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.

ही बातमी ही वाचा 👇👇👇👇👇
योद्धा एक्सप्रेस न्यूज!!सोलापूर-पुणे हायवेवर भीषण अपघात; खासगी बस पलटली; 30 प्रवासी जखमी, 20 गंभीर
सोलापूर असिसिडेन्ट : सोलापूर-पुणे महामार्गावर आढेगावच्या परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. महामार्गावर आज गुरुवारी पहाटे 4 वाजता एका खासगी बसला अपघात झाला. बसचालकाला झोप आल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात 30 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी 20 जणांची प्रकृती गंभीर असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील शिरपूरहून MH 48 के 1918 क्रमांकाची बस पुण्याला निघाली होती. बुधवारी रात्री उशिरा ही बस पुण्याकडे रवाना झाली. पहाटेच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर आढेगावच्या शिवारात बस अचानक पलटी झाली. “आढेगाव शिवारात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खासगी बस पलटी झाली,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
बस खड्ड्यात पलटी झाल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी आणि इतर वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी प्रवाशांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. महामार्ग पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातामुळे परिसरात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून जखमींची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.