योद्धा एक्सप्रेस न्यूज!!समृद्धी हायवे : नागूपर ते मुंबई होणार वेगवान प्रवास; संपूर्ण ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग लोकांच्या सेवेत दाखल, काय आहेत वैशिष्ट्ये?
प्रतिनिधी:- हरीश चव्हाण नासिक

YVCM helping Foundation NGO,,योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य,,
प्रतिनिधी :- हरीश चव्हाण नाशिक
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या (चौथ्या आणि अंतिम इगतपुरी ते आमणे या ७६ किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पणमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, यांच्या उपस्थितीत पार पडले. या चौथ्या टप्प्याच्या लोकार्पणामुळे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झाला आहे. त्यामुळे आता या महामार्गाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत? हे जाणून घेऊयात.
७०१ किलोमीटरचा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर २६ मे २०२३ रोजी शिर्डी ते भरवीर दरम्यानच्या ८० किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.यानंतर ४ मार्च २०२४ रोजी भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या २५ किलोमीटर टप्प्याचे उद्घाटन तत्कालीन सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या सर्व टप्प्यांमुळे मार्च २०२४ पासून नागपूर ते इगतपुरी या ६२५ किलोमीटरच्या प्रवासाला लक्षणीय गती मिळाली होती. यानंतर इगतपुरी ते आमणे या ७६ किलोमीटरच्या टप्प्याचे लोकार्पण आज (गुरुवार) दि. ५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यामुळे फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या ७०१ किमी वाहतूक सेवेला गती मिळाली.
विकासाला चालना देणारा समृद्धी महामार्ग
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांच्या विकासाला चालना देणारा समृद्धी महामार्ग हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तसेच भारतातील सर्वात लांब महामार्ग असून महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांना जोडणारा व २.६ लाख किमी प्रवासाचे जाळे निर्माण करणारा हा महामार्ग आहे. या महामार्गालगत ३ आंतरराष्ट्रीय आणि ७ डोमेस्टीक विमानतळं आहेत. तसेच २ मोठी आणि ४८ लहान पोर्ट (बंदरे) आहेत. ६००० किमी रेल्वे नेटवर्कशी जोडणारा हा समृद्धी महामार्ग आहे. या महामार्गावरुन १२० किमी प्रतितास वेगाने प्रवास शक्य आहे. महामार्गालगत ११ लाख ५० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
८ किमी लांबीचा अत्याधुनिक बोगदा
तसेच या महामार्गावरील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ८ किमी लांबीचा अत्याधुनिक बोगदा, जो देशातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक आहे. १७.५ मीटर रुंदीचा आणि ९ मीटर उंचीचा हा बोगदा दोन्ही बाजूंना तीन-तीन लेन असलेल्या दुहेरी टनेल प्रणालीने सज्ज आहे. यामध्ये वाहनचालकांना ताशी १०० किमीच्या वेगाने सुरक्षितपणे प्रवास करता येईल.
स्प्रिंकलर सिस्टीम तैनात
या बोगद्यात प्रथमच भारतात डेन्मार्कहून आयात केलेले स्प्रिंकलर सिस्टीम बसवले गेले आहे. तापमान ६० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास आपोआप पाण्याची फवारणी सुरू होते. प्रत्येक ९० मीटर अंतरावर फायर उपकरणे, तसेच २४ मीटर अंतरावर एकूण ५७२ फायर झोन, आणि १०० डबल अॅक्सल रिव्हर्सेबल व्हेंटिलेशन फॅन्स बसवण्यात आले आहेत, जे सतत ताजी हवा खेळती ठेवतात आणि धूर बाहेर फेकतात. तर बोगद्यात दर ३०० मीटर अंतरावर २६ क्रॉस-पॅसेजेस तयार करण्यात आले आहेत, जे आपत्कालीन प्रसंगी प्रवाशांना सुरक्षित मार्गाने बाहेर येण्यासाठी उपयोगी ठरतात.त्याचबरोबर या महामार्गावर ३२ मोठे पूल, २५ इंटरचेंज, आणि ६ किमी लांबीचे ओव्हरपास तयार करण्यात आले आहेत.
समृद्धी महामार्गावर असणार ३१ टोलनाके
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ३१ टोलनाके असून नागपूर – शिर्डी दरम्यान १८ टोलनाके आहेत. वायफळ, सेलहोड वडगाव बक्षी, येळकेली, विरुल, धामणगाव, गावनेर तळेगाव, कारंजा लाड, शेलू बाजार, मेहकर, दुसरबीड, सिंदखेडराजा, निधोणा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव, घायगाव – जांबरगाव, कोकमठान याठिकाणी टोलनाके आहेत.
टोल दर किती?
चारचारी वाहने (कार, जीप, व्हॅन) – १४४० रुपये
हलकी, व्यावसायिक, मिनी बस – २०७५ रूपये
बस किंवा ट्रकसाठी – ३६५५ रुपये
अति अवजड वाहनांसाठी – ६९८० रुपये