Breaking newsनागपूरमहाराष्ट्र राज्यमुंबईराजकीय

योद्धा एक्सप्रेस न्युज!!दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही : मंत्री नितीन गडकरी

प्रतिनिधी मुख्य संचालक श्री प्रकाश दंडगव्हाळ ( योद्धा ग्रुप संस्थापक अध्यक्ष )

प्रतिनिधी मुख्य संचालक श्री प्रकाश दंडगव्हाळ योद्धा एक्सप्रेस न्यूज

योद्धा एक्सप्रेस न्युज!!दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही : मंत्री नितीन गडकरी

(27 June, 2025, 08:54 AM)

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जुलै २०२५ पासून दुचाकी वाहनांकडून टोल वसून केला जाणार आहे, अशा बातम्या प्रसारमाध्यमांत झळकत आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मात्र, या केवळ अफवा असून दुुचाकी चालकांकडून कोणत्याही प्रकारे टोल घेतला जाणार नाही असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.

एनएचएआयच्या नवीन तरतुदींनुसार दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर धावण्यासाठी टोल कर भरावा लागेल.

टोल भरण्याचे टाळण्याचा प्रयत्न करणा-या किंवा फास्टॅग न वापरणा-या दुचाकीस्वारकडून २ हजारांचा दंड आकारला जाईल अशा बातम्या प्रसारमाध्यमांत दाखवल्या जात आहेत.

यावर नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली असून या केवळ अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नितीन गडकरी म्हणाले की काही माध्यमांद्वारे राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांकडून टोल वसूल केला जाणार आहे, अशा दिशाभूल करणा-या बातम्या पसरवल्या जात आहेत.

परंतु, असा कोणताही निर्णय झाला नाही. दुचाकी वाहनांना टोल शुल्कातून सूट देण्यात आली. सत्य जाणून न घेता दिशाभूल करणा-या बातम्या पसरवू नयेत. मी अशा माध्यमांचा निषेध करतो.

 काल हा निर्णय घेण्यात आला होता 👇

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button