Breaking newsकोल्हापूर जिल्हाकोल्हापूर शहरमहाराष्ट्र राज्य

योद्धा एक्सप्रेस न्युज!!१०८ रुग्णवाहिका चालकांचे प्रश्न संघटनेसोबत चर्चा करून न सोडवल्यास रुग्णवाहिका चालकांकडून एक जुलैपासून काम बंदचा इशारा…

प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

YVCM helping Foundation NGO संचालित योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाळ
प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

१०८ रुग्णवाहिका चालकांचे प्रश्न संघटनेसोबत चर्चा करून न सोडवल्यास रुग्णवाहिका चालकांकडून एक जुलैपासून काम बंदचा इशारा…

राज्यातील 108 अॅम्बुलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहेत. यांच्या समस्यांबाबत दि. १३ मे. २०२५ रोजी आझाद मैदान मध्ये आंदोलन करून निवेदन देण्यात आले होते.

आरोग्य सेवा संचालकांनी चर्चेच्या वेळी 108 वाहन चालकांच्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे सेवा पुरवठादारांशी पत्र व्यवहारही केला, परंतु सेवा पुरवठादाराकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही असे दिसून येत आहे.

संघटनेनेही सेवा पुरवठादारांना निवेदन देऊन चर्चा करण्याची विनंती केली होती. दि.१५ जून पर्यंत चर्चा करून मागण्यांचे पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही सेवा पुरवठादार यांना देण्यात आलेला होता. परंतु तरीही 108 वाहनचालकांच्या मागण्याबाबत कुठली हालचाल शासन स्तरावरून किंवा सेवा पुरवठादार यांचे कडून होत नाही. त्यामुळे 108 अॅम्बुलन्स वाहन चालकांमध्ये तीव्र असंतोष आहे.

अल्प वेतनावर त्यांना काम करावे लागते, अॅम्बुलन्स अवस्था अत्यंत वाईट आहे, अॅम्बुलन्स आग लागून रुग्ण व वाहनचालकांचा जिवितास धोका निर्माण होईल अशा घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत, वाहन चालकाकडून ज्यादा काम करून घेतले जाते परंतु त्यांना कुठलाही मोबदला दिला जात नाही. या सर्व समस्यांबद्दल सविस्तर निवेदन यापूर्वीच दिले गेले आहे.

दुर्दैवाने सेवा पुरवठादार असेल किंवा शासकीय/ प्रशासकीय स्तरावर कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे तातडीने सेवा पुरवठादार यांच्याबरोबर संघटनेची संयुक्त बैठक बोलावून त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशी संघटनेकडून विनंती करण्यात आली आहे. ३० जून पर्यंत रुग्णवाहिका चालकांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास १ जुले २०२५ पासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

सरकारची ही अत्यंत महत्त्वपूर्ण योजना प्रामाणिकपणे अंमल बजावणी करण्याचा प्रयत्न 108 वाहन चालक करीत आहेत. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून गेले अनेक वर्ष मागण्या प्रलंबित असतानाही काम सुरू ठेवले आहे. परंतु आता शासन आणि सेवा पुरवठादार दोघंही या मागण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे काम बंद आंदोलन करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय चालकांसमोर राहिलेला नाही. तरी सुद्धा रुग्णवाहिका चालकांच्या मागण्याबाबत संबंधित व्यवस्थापन तातडीने हस्तक्षेप करेल अशी अपेक्षा आहे

अध्यक्ष उपाध्यक्ष जन. सेक्रेटरी कोषाध्यक्ष श्री. नागनाथ नरळे,श्री. पांडूरंग ठोमके,श्री. संदिप पाष्टे,श्री. अमित मोरेसेक्रेटरी श्री. खुशाल लकडे,कार्याध्यक्ष,उपाध्यक्ष,व्यवस्थापक(राष्ट्रीय उपाध्यक्ष-राज्य अध्यक्ष सिटू)श्री. संदिप पागोरे,श्री. राहुल गायकवाड,श्री.बाळकृष्ण कदम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button