धार्मिकनाशिक शहर न्यूजमहाराष्ट्र राज्यसामाजिक

योद्धा न्युज: नाशिकमध्ये कुंभमेळा कधी? अखेर तारखा जाहीर

हरीश चव्हाण प्रतिनिधी नासिक योद्धा एक्सप्रेस न्युज

नाशिक कुंभ मेला २०२६ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेतेखाली आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नान, शाही स्नानच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

नाशिक कुंभ मेला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेतेखाली आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक पार पडली. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली. 13 आखाड्यांचे महंत या बैठकीला हजर होते. त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे व अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यावेळी उपस्थित होते. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नानाच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. या दिवशी ध्वजारोहण शुभारंभ होणार असून दुपारी 12 वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल. तर साधुग्राममध्ये 24 जुलै 2027 रोजी आखाडा ध्वजारोहण होईल. तर 24 जुलै 2028 रोजीपर्यंत कुंभमेळा पूर्व सुरू राहणार आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नानाच्या संभाव्य तारखा सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे.

मागील कुंभमेळ्यांत शाही स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गर्दीवर नियंत्रित करणे हे मोठे आव्हान ठरले होते. त्यामुळे यंदा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे तिसरे अमृतस्नान स्वतंत्र दिवशी ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. नाशिकला ११ व त्र्यंबकेश्वरला १२ तारखेला तिसरे अमृतस्नान होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button