योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह !! महिला व बाल प्रकल्प अधिकारी शोभा शिंदे यांची तात्काळ बदली करा- ग्रामस्थ
प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर

महिला व बाल प्रकल्प अधिकारी शोभा शिंदे यांची तात्काळ बदली करा- ग्रामस्थ
श्रीरामपूर :- बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत ऐनतपूर परिसरातील आझादवाडी येथील अंगणवाडी इमारत ही अतिशय खराब व मोडकळीस आलेली असून कोणत्याही परीस्थितीत अपघात होऊन मोठी हानी होण्याची शक्यता असल्याबाबत पालकांनी व परिसरातील नागरिकांनी पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या अंतर्गत असलेल्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शोभा शिंदे यांचेकडे पत्रव्यवहार करून माहिती दिली.
या पत्रात असे म्हटले आहे की, आझादवाडी येथील अंगणवाडी इमारत ही अत्यंत धोकादायक झालेली असून ऊन, वारा, पाऊस अशा परिस्थितीत केव्हाही पडू शकते. अनेक लहान मुले अंगणवाडीत शिक्षण घेत आहेत. त्यांचा जीविताचा प्रश्न असल्याने महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शिंदे यांना वारंवार समक्ष व फोनवर कल्पना देण्यात आलेली आहे.
मात्र त्यांच्याकडून कुठलीही कार्यवाही न झाल्याने त्यांच्याशी रितसर पत्र व्यवहार करण्यात आला. मात्र सदरील पत्र व्यवहाराला उत्तर देताना श्रीमती शिंदे यांनी “अंगणवाडी केंद्र आझादवाडी हे जिल्हा परिषद वस्ती शाळा इमारत आहे. व शेती महामंडळाच्या जागेत आहे़. इमारत देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ग्रामपंचायत बेलापूर बुद्रुक यांची आहे. तसेच इमारत बांधण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत नवीन इमारत प्रस्ताव या कार्यालयात प्राप्त झाल्याबरोबर मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येईल.” असे बेजबाबदारपणे लिखित उत्तर दिल्याने पालकांमध्ये संपत्ताची लाट उसळली आहे. श्रीमती शिंदे यांना अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांच्या जीविताचे कुठलेही देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रकल्प अधिकारी या नात्याने अंगणवाडीची तपासणी करणे हेही त्यांचे कर्तव्य आहे. मात्र त्यांना त्यांच्या कर्तव्याचा पूर्णपणे विचार पडल्याने ते असे बेछुट वक्तव्य करून कर्तव्यात कसूर करत असल्याने नागरिकांकडून त्यांच्या तात्काळ बदलीची मागणी करण्यात आली आहे. यद्कदाचित कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास श्रीमती शिंदे व संबंधित त्यास पूर्णस्वी जबाबदार राहतील. वेळप्रसंगी कायदाही हाती घेण्याची भाषा पालकांकडून बोलली जात आहे.
श्रीमती शिंदे यांची तात्काळ बदली करावी म्हणून महिला व बालकल्याण विकास मंत्री आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी,अहिल्यानगर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्यासह गट विकास अधिकारी श्रीरामपूर यांना पत्र देण्यात आलेली आहे. श्रीमती शिंदे यांची तात्काळ बदली न केल्यास पालकांकडून उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात. अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या सौ मुबा शेख यांनी दिली.
कृपया वृत्तास प्रसिद्धी मिळावी ही नम्रतेची विनंती.
आपली विश्वासू
मुभा शेख
मो. नं.899982855