योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह!! नाशिक सिडको रस्त्यांवर खड्ड्यांचा प्रचंड वावर; अपघात होण्याची भीती वाढली,लेखानगर ते पाथर्डी फाटा खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण
प्रतिनिधी हरीश चव्हाण नासिक योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह

नासिक सिडको भागातील खड्ड्यांमुळे मोठ्या अपघातांची भीती; नागरिकांनी महापालिकेला दिली तातडीची सूचना
नासिक –नासिक सिडको भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे होऊन अपघात होण्याची भीती वाढली आहे. लेखानगर ते पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी खोल खड्डे पडलेले आहेत. विशेषतः लेखानगर येथील स्टेट बँकेसमोर दर वर्षी या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचा अपघात होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या गंभीर समस्येकडे नासिक सिडको आयुक्तांकडे त्वरित लक्ष वेधण्याची नागरिकांची मागणी आहे.
रस्त्यांची बिकट अवस्था आणि अपघाताची शक्यता
लेखनगर ते पाथर्डी फाटा रस्त्यावरील विविध खड्डे मोठ्या अपघातांना निमित्त ठरत आहेत. टू-व्हीलर चालकांना या खड्ड्यांमुळे मोठा धोका आहे.या खड्ड्यांवर वेळेवर दुरुस्ती न झाल्यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे. यापूर्वीही या भागात अनेक अपघात झालेले असून, नागरिकांचे रस्ते सुरक्षिततेचे प्रश्न अधोरेखित होत आहेत.
औदुंबर बस स्टॉपच्या कचर्यामुळे आरोग्याचा धोका
औदुंबर बस स्टॉप परिसरात स्थानिक नागरिक इन्कम टॅक्स विभागाच्या बंद पडलेल्या इमारतीसमोर कचरा टाकत असल्याने पावसाळ्यात त्या ठिकाणी दुर्गंधी पसरते. या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो, ही समस्या देखील तातडीने सोडवण्याची गरज आहे, अशी नागरिकांची नासिक महानगरपालिकेकडे विनंती आहे.
नागरिकांचा मेळावा आणि पुढील कारवाईची मागणी
सिडको भागातील या समस्यांशी निगडीत नागरिकांनी नासिक महानगरपालिका, स्थानिक नगरसेवक, आणि आमदार यांना समस्या सांगून त्वरित तोडगा काढावा, अशी आवाहन केली आहे. या प्रकरणी पुढील कारवाई न झाल्यास (संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाळ):-YVCM Helping Foundation या स्थानिक एनजीओकडून सिडको महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिनिधी योद्धा एक्सप्रेस न्युज :- हरीश चव्हाण यांनी दिली आहे.
महापालिकेच्या जबाबदारीसंदर्भात आवाहन
दरम्यान, सिडको विभागातील रस्त्यांवरील अनेक खोल खड्डे, खुल्या खड्ड्यांनी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. नागरिकांनी मागणी केली आहे की नासिक महानगरपालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्यांचे त्वरित दुरुस्ती काम करावे, तरच भविष्यात मोठ्या अपघातांपासून बचाव होऊ शकतो.