Breaking newsअहिल्यानगर जिल्हानोकरी विशेषपुणेमहाराष्ट्र राज्यमुंबई

योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह!!श्री गणेश प्रविण इंगळे यांची अप्पर पोलीस अधीक्षक पदी बढती

प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर योद्धा एक्सप्रेस न्यूज

योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह!!श्री गणेश प्रविण इंगळे यांची अप्पर पोलीस अधीक्षक पदी बढती

श्री गणेश प्रविण इंगळे यांची नुकतीच अप्पर पोलीस अधीक्षक अंमलीपदार्थ विरोध टास्क पुणे या पदावर बढती झालेली आहे.अतिशय कार्यतत्पर पोलिस अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी यापूर्वीच ख्याती मिळवलेली आहे. विशेष करून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भागात केलेल्या कामाबद्दल सर्वांनी कौतुकाचा त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे.या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक पदक व पोलिस विशेष सेवा पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
अतिशय खडतर परिस्थितीवर मात करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनकुटे ता.पारनेर येथे प्राथमिक शिक्षण पुर्ण केले. त्यांनतर नगर तालुक्यातील श्री कौडेश्वर विद्यालय पिंपळगाव कौडा येथे माध्यमिक शिक्षण पुर्ण करुन त्यांनी पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव खुर्द या ठिकाणी शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम केले. या दरम्यान स्पर्धा परिक्षा तयारीला सुरवात करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत त्यांची नायब तहसीलदार पदी नियुक्त झाली. त्यांनतर पोलीस उपविभागीय अधिकारी निवड करण्यात आली.

सध्या पोलिस साहाय्यक आयुक्त गुन्हे शाखा पुणे या पदावर काम करत असताना नुकतेच त्यांना उत्कृष्ट पोलिस अधिकारी म्हणून मा .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.आजच्या काळात युवा पिढी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाच्या आहारी जात असताना दिसून येते. इंगळे यांच्या माध्यमातून निश्चितच भविष्यात या संदर्भात कठोर पाऊल उचलून या बाबीला आळा घालण्याचे काम करतील अशी सर्व सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button