नाशिक जिल्ह्यात 24 जानेवारी रोजी नो फ्लाय झोन मनाई आदेश
प्रतिनिधी योद्धा एक्सप्रेस न्युज :- हर्षल चव्हाण

प्रतिनिधी हर्षल चव्हाण :- नासिकला केंद्रीय गृह,सहकार मंत्री अमित शहा हे शुक्रवार २४ जानेवारी रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यानिमित्त ते नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर व मालेगाव येथे भेट आहेत. त्यांची सुरक्षितता लक्षात घेता, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिक जिल्ह्यात दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजीचे रात्री 00.00 ते दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी 00.00 या कालावधीत ड्रोन उड्डाणास प्रतिबंधित करण्यात आले आहे.
याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिले आहेत.उपरोक्त कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने नो ड्रोन फ्लाय झोन घोषित करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे ड्रोन (मानवरहित साधन), पॅरा ग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हॉटएअर बलून्स, मायक्रोलाईटस् एअरक्राफ्ट आदी तत्सम हवाई साधनांमार्फत सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय ड्रोनचे उड्डाण/ वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे