वर्षभरात जवळपास 50 हून अधिक शॉर्ट फिल्म युट्युब चैनल च्या माध्यमातून जगभरात खळबळ उडवणारा एकमेव युट्युब चैनल म्हणजे नासिक ची शान असलेला खळबळ चैनल ,
प्रतिनिधी श्री प्रकाश दंडगव्हाळ योद्धा एक्सप्रेस न्युज संपादक

प्रतिनिधी नासिक :-वर्षभरात जवळपास 50 हून अधिक शॉर्ट फिल्म युट्युब चैनल च्या माध्यमातून जगभरात खळबळ उडवणारा एकमेव युट्युब चैनल म्हणजे नासिक ची शान असलेला खळबळ चैनल , आज वर्षभरात 50 हुन अधिक सामाजिक विषयाला वाचा फोडणारे कथानक घेऊन जगभरात खळबळ उडविली . असा नावा प्रमाणेच खळबळ चैनल प्रेक्षकाच्या पसंतीत उतरत आहे त्या साठी चैनल च्या निर्मात्या मा.रेखाताई मंजुळकर स्वतः चे अपार कष्ट करीत व गोरगरीब जनतेसाठी देण्यासाठी समाजकार्य करीत आपली वेगळीच ओळख निर्माण करीत आहेत अभिनयाचा छंद असणाऱ्या नाशिक जिल्ह्यात दिंडोरी येथे राहणाऱ्या मा.रेखाताई मंजुळकर. याचे करावे तेव्हडे कौतूक थोडेच आहेत हलाखीची जिवन शैली जगत आपल्या मुला मुलीचे संगोपन करता करता जनतेचे संगोपन कधी सुरू झाले हे त्यांनाच समजले नाही अशा नेहमीच हसतमुख राहणाऱ्या हळव्या आणि अभिनयाची जिद्द चिकाटी सोबत मा.रेखाताई मंजुळकर यांनी आपल्या सोबतीला
अभिनेते /दिग्दर्शक भगवान गि. देवकर यांना घेऊन खळबळ या युक्युब चैनल च्या माध्यमातून विनोदी , सामाजिक , कौटुंबिक, भावनात्मक अशा अनेक शॉर्ट फिल्म निर्माण करीत
आज जगभरात खळबळ नावाची एक चळवळच जनु पोहोचवण्याचे काम आता रेखाताई करीत आहेत . शॉर्ट फिल्म प्रसारित करताना त्यांनी प्रत्येक कलाकारांची दखल घेत अभिनय क्षेत्रात आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
https://youtu.be/pfLUKsD7Wys?feature=shared
खरंतर नवीन कलाकारांना आता चित्रपट क्षेत्रात आणि सिरीयल मध्ये सहजासहजी घेतले जात नाही. आशा कलाकारांकडे अभिनय करण्याची इच्छा असली तरी आपल्यातील सुप्त कलागुण त्यांना योग्य ते प्लॅटफॉर्म मिळत नाही प्लॅटफॉर्म मिळालेही तरी सादरीकरणात योग्य मार्ग दर्शन मिळत नाही. अशा कलाकारांना पुढे जाण्यासाठी एकही संधी देण्यात येत नाही अशा कलाकारांना संधी कशी मिळेल व योग्य ते मार्गदर्शन मिळावे. यासाठी मा. रेखाताई मंजुळकर (निर्माता ) व दिग्दर्शक भगवान गि देवकर हे जास्तीत जास्त प्रयत्न करीत आहेत.
आपण तयार करत असलेली वेब सिरीज ही नुसती मनोरंजन म्हणून नाही तर या वेब सिरीज मधून प्रेक्षकांना प्रत्येक एपिसोड मधून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो या साठी खळबळ चैनल वरील प्रत्येक एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी चैनल ला सबस्क्राईब करावे व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये टाकाव्या असे आवाहन दिग्दर्शक भगवान गि. देवकर यांनी केले आहे. कॅमेरामन/ एडिटर पार्थ भगवान देवकर यांची बहुमोलाची साथ असल्याचे रेखाताई मंजुळकर सांगत आहेत. भगवान देवकर हे नुसते दिग्दर्शक नसून एक उत्कृष्ट अभिनेता देखील असल्याने ते देखील या वेब सिरीज मध्ये चांगल्या पद्धतीने भूमिका निभावत असतात. आजपर्यंत वेगवेगळ्या कलाकारांनी आपल्या या खळबळ मराठी वेब सिरीज मध्ये काम करून सहकार्य केल्याने खळबळ ची एक मोठी टीम निर्माण झाली आहे. या टीम मध्ये उत्कृष्ट अभिनय करणारांच्या ही संख्या काही कमी नाही. याशिवाय अनेक लेखकांनीही वेगवेगळे विषयाला धरून रेखाताई मंजुळकर यांना कथा पुरवल्या आहेत. आपण निर्माण केलेली खळबळ मराठी वेब सिरीज ची टीम आता खूपच प्रेक्षकांची आवडती टीम झाली आहे. त्यामुळे आता नुसतीच वेब सिरीज न करता लवकरच चित्रपट निर्मिती च्या दिशेने ही टीम आपले पाऊल सरसावत आहे. लवकरच एका नविन मराठी चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करण्याची घोषणा रेखाताई मंजुळकर यांनी केली आहे. आजकालच्या प्रेक्षकांच्या मनात असलेले विचार आकांशा यांचा विचार करून समाजाला काय बोध घेता येईल हे दाखवण्याकरता आपण एक सामाजिक विषयावरील उत्तम असा कौटूंबिक चित्रपट नवीन वर्षात तयार करणार आहोत असे रेखाताई मंजुळकर यांनी सांगितले. प्रत्येक आठवड्याला एक नवीन कथानक , उत्तम विषय , नवीन लोकेशन , दमदार अशा अनुभवी कलाकारां सोबत नविन कलाकारांसाठी सुवर्ण संधीच आहे
. यासाठी सर्व प्रेक्षक मायबाप आपले सहकार्य मोलाचे आहे आपल्या सहकार्याने आपल्या मदतीने आम्ही दर्जेदार एपिसोड तयार करत आपली सेवा आपल्या पर्यंत पाहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू यासाठी मनमौजी फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत खळबळ चॅनलला भरभरून प्रेम दया एपिसोड ला लाईक व सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा आपली प्रतिक्रिया हीच आमच्या कामाची पोचपावती आसेल असे मा.रेखाताई मंजुळकर यांनी पत्रकारां सोबत बोलताना सांगितले आहे.

