नाशिक शहर न्यूजमहाराष्ट्र राज्य

मुंबई नाशिक हायवे : कसारा घाटात बसचा थरारक अपघात, मिनी बस ३ वेळा पलटली; २१ जण गंभीर जखमी

कसारा घाट असिसिडेन्ट : मुंबई - नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या महामार्गावर मिनी बसचा भीषण अपघात झाला असून, अपघातात २१ जण जखमी तर, ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रतिनिधी नाशिक – नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या महामार्गावर मिनी बसचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात २१ जण जखमी तर, ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. मिनी बस चालकाचा ताबा सुटल्यानं हा धक्कादायक अपघात घडला आहे. बस चालकाचा ताबा सुटल्यानं बस ३ वेळा उलटली. ज्यामुळे मिनी बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. मुंबई – नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कसारा घाटात हा अपघात घडल्याची माहिती आहे. कसारा घाटातील चिंतामणवाडी मिनी बस उलटली. मिनी बस चालकाचा ताबा सुटल्यानं मिनी बस उलटली असल्याची माहिती समोर आली आहे.मिनी बस तीन वेळा उलटल्यानं बसमधील प्रवासी गंभीर झाले आहेत. प्रवास करत असलेल्या प्रवाशांमध्ये २१ जण जखमी झाले आहेत. तर, ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. बसमध्ये आणखीन किती प्रवासी होते? याचा तपास सुरू आहे. अपघातग्रस्त कुटुंब मुंबईहून सिन्नरला एका लग्नाच्या कार्यक्रमाला जात होते.अपघातग्रस्त रूग्णांना स्थानिकांनी तातडीनं जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी मिनी बस चालकाचा अपघात घडला कसा? या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दरम्यान आणखीन कुणाचा अपघात घडला आहे का? याचाही तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button