नाशिक: अवैध सावकार देवरेविरोधात अजून एक गुन्हा; ६ लाखांच्या मोबदल्यात महिलेकडून बळकावला फ्लॅट
प्रतिनिधी समीर सनदी महाराष्ट्र मीडिया अध्यक्ष

नाशिक (प्रतिनिधी): महिलेला ६ लाखांचे कर्ज देत ६ लाखांच्या मोबदल्यात फ्लॅटचे बेकायदेशीर साठेखत करत महिलेचा फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अवैध सावकार वैभव यादवराव देवरे याच्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. देवरेच्या विरोधात आजपर्यंत १३ गुन्हे दाखल झाले आहेत. देवरेसह त्याची पत्नी सोनाली आणि शालक निखिल पवार कारागृहात पोलिसांनी दिलेली माहिती आणि सविता भामरे (रा. गुलमोहर कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित वैभव देवरेकडून २०१८ मध्ये आर्थिक अडचण असल्याने ६ लाखांचे १० टक्के व्याजाने कर्ज घेतले होते. संशयिताने तारण म्हणून फ्लॅट ठेवावा लागेल अशी धमकी दिली. कर्ज देतेवेळी फ्लॅटबाबात काही सांगितले नसताना संशयित देवरेने दमदाटी करत फ्लॅटचे बेकायदेशीर साठेखत लिहून घेतले.कर्जाची रक्कम फेडली असताना आणखी पैशांची मागणी करत खंडणी मागितली. कोरे चेक घेऊन पतीला शिवीगाळ करत पैसे दिले नाही तर ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांत तक्रार दिली तर पत्नी सोनालीच्या नावाने पतीविरोधात खोटी तक्रार देण्याची धमकी दिली. महिलेने पोलिसांत तक्रार केली. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ७४/२०२५)१३ गुन्ह्यांचा तपास:
वैभव देवरेविरोधात दाखल १३ गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. खंडणी आणि सावकारी कर्जाची वसुली केली असल्यास अशा नागरिकांनी वैभव देवरेच्या विरोधात तक्रार करण्याचे आवाहन गुन्हे शाखेचे उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले आहे