महाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यसोलापूर शहर

तुळजापूरच्या घाटात बस उलटून महिला ठार; आळंदीतील ४० ते ४५ भाविक जखमी

धाराशिव बस असिसिडेन्ट | जखमींना सोलापूरला हलवण्यात आले. January 29, 2025 9:20 PM

प्रतिनिधी सोलापूर:-तुळजापूरला देवदर्शनासाठी आलेल्या आळंदी येथील भाविकांच्या लक्झरी बसला तुळजापूरच्या घाटामध्ये अपघात झाला. यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर ४० ते ४५ भाविक जखमी झाले आहेत. रेखा गणपत ओव्होळ असे या मृत महिलेचे नाव आहे. तुळजापूरच्या घाटात पहिला वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस कठडा तोडून उलटली. हा अपघात आज (दि. २९) सायंकाळी झाला.आळंदी येथील ४५ भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी लक्झरी बसमधून (एम एच १२ पी क्यू ०६६६) आले होते. तुळजाभवानी देवीचे दर्शन करून आज सायंकाळी पाचच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पुढे जात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने पहिल्या वळणावर बस वळवता आली नाही. त्यामुळे बस बाजूच्या लोखंडी कठड्याला धडकून उलटली. दरम्यान, २०० फूट खोल असणाऱ्या दरीमध्ये ही बस पडण्यापासून केवळ पाच फूट अंतरावर थांबली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बसच्या काचा भाविकांच्या शरीरामध्ये घुसल्या आहेत. बसमध्ये महिला भाविक अधिक होत्या. जखमींवर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी क्रेनच्या साह्याने ही बस साडेसहा वाजता बाजूला केली. त्यामुळे तासभर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत झाली. नागरिकांनी अपघातस्थळी मोठी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर आणि इतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button