नागपूरभंडारामहाराष्ट्र राज्यमुंबई

लग्नाच्या जेवणात बीफची मेजवानी देणं महागात पडलं, पोलिसांनी नवरदेवासह 5 जणांना उचललं

लग्नाच्या जेवणात बीफची मेजवाणी देणं महागात पडलं, पोलिसांनी नवरदेवासह 5 जणांना उचललं

प्रतिनिधी नागपूर,:- लग्नाच्या जेवणात बीफची मेजवाणी देणं भंडाऱ्यातील एका नवरदेवाला चांगलचं महागात पडलंय. सायंकाळी होणाऱ्या लग्न सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांना मेजवानी देण्यासाठी तीन गाईंची निर्घृण कत्तल करण्यात आली. याप्रकरणी नवरदेवासह पाच जणांना अटक करण्यात आली. हा प्रकार भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे घडलाय. गाय कत्तल प्रकरणी थेट नवरदेवालाचं अटक करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

गाईंची कत्तल केल्याप्रकरणी नवरदेवासह पाच जणांना अटक
1) एजाज शहा (वय 21) – नवरदेव 2) शाकीर शेख (28)
3) मोशिन खान (21) 4) शरीफ शेख (30)
5) इझास निसार शहा (21)
हे सर्व पवनी येथील रहिवाशी आहेत.

पोलिसांनी नवरदेवाला अटक केल्याने खळबळ
अधिकची माहिती अशी की, लग्नाच्या मेजवानीसाठी तीन गाईंची कत्तल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. नवरदेवासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनीतून ही घटना समोर आली आहे. आज सायंकाळी होणाऱ्या लग्न सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांना गाईंच्या मासांची मेजवानी देण्यासाठी तीन गाईंची निर्घृण कत्तल करण्यात आली होती. मात्र, पाहुण्यांना बीफची मेजवानी देणे नवरदेवाला चांगलचं महागात पडलंय. याप्रकरणी नवरदेवासह पाच जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई भंडाऱ्याच्या पवनी इथं आज करण्यात आली. गाय कत्तल प्रकरणी थेट नवरदेवालाचं अटक करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी : चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामाचा काही भाग राहिवासी सोसायटीवर कोसळला

चेंबूरमध्ये मेट्रोचे बांधकाम सुरु असताना अर्धवट बांधकामाचा काही भाग राहिवासी सोसायटीवर कोसळल्यामुळे खळबळ उडाली आहे.  वडाळ्याकडे जाणाऱ्या मेट्रोचे काम सुरु सध्या सुरु आहे. याच मेट्रोच्या सळ्याच काम थेट चेंबूरमधील सुमन  नगर सोसाइटी वर कोसळले आहे. दरम्यान मेट्रोचे अर्धवट बांधकाम कोसळल्यामुळे सोसायटीतील राहिवाश्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ही घटना सायन ट्रॉम्ब रोडच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर घडली आहे. 20 फूट सळ्या टाकून उभे केलेले काम थेट रहिवाशी सोसायटी परिसरात पडले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button