कल्याण डोंबिवलीमहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यमुंबई

आस्क वृद्धाश्रम अनाथ आश्रमाच्या प्रयत्नातून मुलीची व आईची अखेर भेट

आस्क वृद्धाश्रम संस्थापक अध्यक्ष श्री दादासाहेब गायकवाड

प्रतिनिधी प्रकाश दंडगव्हाळ :- मुलीची व आईची अखेर भेट नवऱ्याने लेकर ठेवून तीला घरातून हाकलून दिली पल्लवी थेट एसटीने हडपसर गाठले रात्रीची वेळ रोड चुकली आठ ते दहा दिवसांपासून येड्या सारखी भटकत राहिली पोटात अन्नपाणी नाही माहेरचे घर मिळेना

रात्रंदिवस भटकताना एकदाही एक मिनिट देखील झोपली नाही उपाशी पोटी भेकराईनगर येथे विक्रम गिते यांच्या घराजवळ अंधारात उभी होती गितेंच्या पत्नीने चौकशी केली असता ती येडी आहे असे लक्षात आले त्यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यातील PSI बापूसाहेब खंडारे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी मुलीला प्रश्न केले पण काही उपयोग झाला नाही.

खंडारे साहेबांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मढवे मॅडमशी संपर्क साधून हकिकत सांगितली तेंव्हा त्यांनी सुरक्षेच्या कारणाने आपल्या आस्क वृद्धाश्रम अनाथाश्रमात ठेवण्यास सांगितले पो.खंडारे व पो.दयानंद कांबळेनी आस्क वृद्धाश्रम अनाथाश्रम मध्ये रितसर दाखल केली संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांनी तीला नाव पत्ता विचारुन सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली अखेर पत्ता मिळाला मुलगी आईच्या ताब्यात सुखरुप मिळाली असून याकामी विक्रम गिते, PSI खंडारे पो.कांबळे आश्रम प्रमुख दादासाहेब गायकवाड यांनी काम पाहीले 9823105610

 

कल्याण डोंबिवली पालिकेच्या लिपिकास लाच घेताना अटक तक्रारदाराकडून दीड लाख रूपये घेताना लिपिक प्रकाश धिवर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या लिपिकास लाच घेताना अटक

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या बाजार आणि परवाना विभागातील लिपिक प्रकाश काशिनाथ धिवर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दीड लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार हे पालिका हद्दीत मटण विक्रीचा व्यवसाय करतात.

या व्यवसायाचा परवाना अर्ज स्वीकृत करण्यासाठी आणि परवाना हस्तांतरित करण्यासाठी मदत म्हणून बाजार व परवाना विभागातील लिपिक प्रकाश धिवर यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वत:साठी आणि वरिष्ठांसाठी दोन लाख रूपये लाचेची मागणी केली होती. एवढी रक्कम देणे तक्रारदारास शक्य नसल्यामुळे तडजोडी अंती ही रक्कम एक लाख ५० हजार स्वीकारण्याचे लिपिक धिवर यांनी मान्य केले. परवाना अधिकृत असताना बाजार व परवाना विभागातील कर्मचारी आपल्याकडे मोठी लाच मागत असल्याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणी कारवाईत धिवर हे लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button