क्राईम न्यूजधुळे जिल्हानागपूरमहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्य

शिरपूर मध्ये पाच लाखाच्या बनावट नोटा जप्त

बनावट नोटांच्या रॅकेटचे सूत्र गुजरातमधून हलल्याचे प्राथमिक तपासात उघड

प्रतिनिधी धुळे:-शिरपूर शहरात सुमारे चार लाख 11 हजार पाचशे रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. बनावट नोटांचे रॅकेट गुजरात राज्यातून नाशिक जिल्ह्यात तसेच तेथून धुळे जिल्ह्यातील शिरपूर मध्ये आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान अटक केलेल्या आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून त्यांचा चौकशीमध्ये आता गुजरात मधील बनावट रॅकेट चालवणाऱ्या म्होरक्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

शिरपूर येथील खालचे गाव परिसरात काही तरुण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने हालचाली करीत या भागामध्ये पाळत ठेवली. यावेळी त्यांना पुंडलिक ऊर्फ समाधान नथा पदमोर ( रा.हट्टी ता. साक्री) , पिरन सुभाष मोरे ( रा. चांदपूरी ता. शिरपूर) व रंगमल रतिलाल जाधव (रा.अंचाळे ता. साक्री) हे शिरपूर शहरातील खालचे गाव येथे संशयीतरित्या फिरतांना मिळुन आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ असलेल्या सॅक (बॅग) मध्ये 4 लाख 11 हजार 500 रूपयाच्या एकूण 823 बनावट नोटा मिळुन आल्याने त्यांच्याविरूध्द शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असतात त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान अटकेतील आरोपींची पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली. यातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

बनावट नोटाच्या बदली मिळणार 20 ते 30 हजार रूपये
आरोपी पुंडलिक ऊर्फ समाधान नथा पदमोर याने सांगितले की, सदरच्या नोटा त्याच्या ओळखीचा इसम नामे गौरव सुकदेव ठोंबरे (रा.मनमाड जि. नाशिक) याने आम्हाला दिलेल्या होत्या व मी तुम्हाला ज्या व्यक्तीला ज्या ठिकाणी जावुन नोटा द्यायच्या आहेत असे तो सांगेल. त्याप्रमाणे सदरच्या नोटा जावुन द्यायच्या आहेत. बदल्यात तो मला 20 ते 30 हजार रूपये देणार होता. म्हणून सदरच्या नोटा त्याने माझ्याकडे व रंगमल जाधव आमच्याकडे दिलेल्या होत्या. अशी माहिती तपासात पुढे आली.

सदर गुन्ह्यात अटक आरोपीतांनी दिलेल्या माहिती वरून गौरव सुकदेव ठोंबरे ( रा. मेसनखेडे खुर्द ता. चांदवड) यास अटक करण्यात आली असुन त्याने सदर गुन्ह्याच्या तपासात माहिती दिलेली आहे की, सदरच्या नोटा या त्याला त्याच्या ओळखीचा इसम राज पटेल रा. भुज (गुजरात) याने दिलेल्या आहेत. सदरच्या नोटा तो ज्या व्यक्तीला सांगेल त्याला त्या द्यायच्या आहेत, असे त्याने सांगितले आहे.

डारा: बँक व्यवस्थापकाने दोन कोटींच्या लोभापायी दिले पाच कोटी

तुमसर येथून जप्त केलेल्‍या रकमेसोबत पोलिस अधिकारी

भंडारा: तुमसर शहरातील इंदिरानगर येथील राजकमल ड्राय क्‍लिनिंग आर्ट या दूकानात पाच कोटी रुपयांची रोकड सापडल्याप्रकरणी अ‍ॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकासह दहा जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक गौरीशंकर फुलचंद बावनकुळे (४०) यांना ५ कोटी रुपये रोख देण्याच्या मोबदल्यात त्यांना दोन कोटी देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे ७ कोटी रुपये जमा करण्याचे आरोपींनी कबूल केले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी बुधवारी, पत्रपरिषद घेऊन या संपूर्ण घटनेची माहिती दिली. आरोपी गेल्या काही दिवसांपासून तुमसर शहरातील काही लोकांशी रोख रकमेसाठी संपर्क करत होते. हसन म्हणाले की, या प्रकरणाची माहिती आरबीआय, आयकर विभाग, ईडी यांना देण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी संबंधित विभागाचे पथक तुमसर येथे तपासणीसाठी पोहोचले.

तुमसर येथील अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक गौरीशंकर फुलचंद बावनकुळे (४०) आणि तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील अ‍ॅक्सिस बँकेचे आँपरेटिंग हेड विशाल तेजराम ठाकरे (२९) यांच्याशी काही दिवसांपूर्वी या टोळीने संपर्क साधला होता. रोख रक्कम बड्या कंपन्यांसाठी आहे, असे सांगून आरोपींनी बँक व्यवस्थापक गौरीशंकर यांना ५ कोटी रुपये रोख रक्कम दिल्यानंतर आरटीजीएसद्वारे सात कोटी रुपये बँक खात्यात परत करण्याचे आमिष दाखवले. या लालसेपोटी गौरीशंकर बावनकुळे यांनी मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी बँकेच्या सुरक्षा गृहातून पाच कोटींची रक्कम काढून इंदिरानगर येथील राजकमल ड्राय क्लीनिंग आर्ट या दुकानात परस्पर नेली. यासाठी बँक व्यवस्थापक गौरीशंकर बावनकुळे यांनी ड्राय क्लीनिंग दुकानदार जगदीश शंकरराव काटकर (वय ४८, रा. संत जगनाडे नगर, तुमसर) यांना एक लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले होते.

दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ड्राय क्लीनिंगच्या दुकानावर छापा टाकून पाच कोटी रुपयांची रोकड जप्त केली. या घटनेची माहिती अ‍ॅक्सिस बँकेच्या वरिष्ठांना देण्यात आली. सरकारी पंच आणि व्हिडिओ चित्रीकरणात रोख रुपये मोजण्यात आले. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आयकर विभाग आणि ईडीच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी भंडारा येथील अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक अभय मनोज नशीने यांच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी अ‍ॅक्सिस बँकेच्या तुमसरचे व्यवस्थापक गौरीशंकर फुलचंद बावनकुळे (वय ४०) यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोलकर करीत आहेत.

गोंदियाच्या एमडी इंडस्ट्रीज आणि अमन स्क्रॅप कंपनीकडून अ‍ॅक्सिस बँकेतील आशिष ट्रेडर्स आणि रोहित ट्रेडर्स यांच्या खात्यावर पाच कोटी रुपये जमा झाल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी सांगितले. उर्वरित दोन कोटी रुपयांच्या प्रतीक्षेत बँक व्यवस्थापक व इतर होते. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली. या सर्व कंपन्यांशी संबंधित लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे.

अ‍ॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकाने २ कोटींच्या लोभापोटी बँकेतून ५ कोटींची रक्कम काढून ड्राय क्लीनिंग आर्ट दुकानात आणली होती. दिल्ली, उत्तराखंडसह विविध राज्यांतील आरोपींनी बँक व्यवस्थापकाला ५ कोटी रुपयांऐवजी ७ कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले होते. बँकेतून पैसे काढून पैसे लुटण्याच्या तयारीत ते होते. मात्र पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. तुमसर पोलिस ठाण्यात रोख रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button