योद्धा न्यूज !! सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्…; नाशिकमध्ये खळबळ
🎤 प्रतिनिधी प्रदीप पाटील :- नाशिकच्या बागलाण तालुक्यातील दहाणे गावातील सलून व्यावसायिकाने टोकाचे पाऊल उचलले आहे.

प्रतिनिधी नासिक :-उसनवारी व व्याजाने घेतलेल्या पैशांची वेळेवर परतफेड न करू शकल्यामुळे नाशिकच्या बागलाण तालुक्यातील दहाणे गावातील सलून व्यावसायिकाने सटाणा शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या आविष्कार लॉजमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दन्हाणे गावातील 25 वर्षीय तरुण जनार्दन विजय महाले याने साधारण सहा महिन्यांपूर्वी आर्थिक उलाढाल करताना हातउसनवार व व्याजाने पैसे घेतले होते. वेळेवर पैसे परत न करता आल्याने तो गाव सोडून इतरत्र राहायला निघून गेला होता. पैसे मागणाऱ्यांचा तगादा सतत सुरू होता.
पंख्याला गळफास घेत आत्महत्या
रक्कम वेळेवर दिली जाणार नसल्याचा अंदाज आल्याने वैफल्यग्रस्तातून सटाणा शहरातील आविष्कार लॉजवर खोली घेऊन मुक्कामी राहण्याचे कारण देत जनार्दन याने पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. लॉजवरील कर्मचाऱ्यांच्या सदरची बाब लक्षात येताच त्यांनी सटाणा पोलिसांना कळविले. जनार्दन यांच्या भावाने पोलिसांत दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस टिळेकर व उमेश भदाणे करीत आहेत.
चुंचाळे शिवारात युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुमीत वसंत पाईकराव (20, रा. घरकुल, चुंचाळे शिवार) असे मृताचे नाव आहे. सुमित याने रविवारी (दि. 16) दुपारी अडीचच्या सुमारास घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नाशिक-पुणे महामार्गावरील पंपावर दरोडा
दरम्यान, नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटाच्या जवळ असलेल्या वाघ मोटर्स या टाटाच्या डीईएफ पंपावर चौघांनी तलवार, कोयता, दांडे घेऊन दरोडा टाकत 40 हजारांची रोकड लुटल्याची घटना रविवारी (दि.16) रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. मोहदरी घाटाच्या पहिल्या वळणावर असलेल्या वन विभागाच्या वनोद्यानाच्या समोरील बाजूस रस्त्याच्या कडेला प्रशांत वाघ यांचा टाटा मोटर्सचा डीईएफचा पंप एक वर्षांपासून सुरु आहे. पंपाच्या पाठीमागील बाजूस राणेखानचे जंगल असून त्याच भागातून अंधाराचा फायदा घेत चौघा दरोडेखोरांनी पंपाच्या कार्यालयात प्रवेश केला. यानंतर तलवार, कोयत्याचा धाक दाखवत जवळपास 40 हजारांची रोकड लुटली व तेथून पलायन केले
९ सनदी अधिका-यांच्या बदल्या : राहुल कुमार मीना लातूर जिल्हा परिषदेचे सीओ
राज्य सरकारने मंगळवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील ९ सनदी अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची बदली कोकण विभागीय आयुक्त म्हणून झाली आहे. तर कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांची नेमणूक राज्य उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.राहुल कुमार मीना यांची बदली लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली आहे.
आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांची बदली महिला आणि बालविकास आयुक्त, पुणे येथे झाली आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक विमला आर. यांची नेमणूक निवासी आयुक्त आणि सचिव म्हणून महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे करण्यात आली आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची बदली साखर आयुक्त, पुणे येथे झाली आहे. तर भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिलिंदकुमार साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
धाराशिवचे जिल्हाधिकारी ओंबासे यांची बदली
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची बदली सोलापूर महापालिका आयुक्तपदी, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांची बदली आदिवासी विकास आयुक्त, नाशिक येथे तर गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना यांची बदली लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली आहे.