मंदिरातील एटीएममधून आता सोन्या-चांदीचे शिक्के काढता येणार : तिरुपतीमध्ये देशातील पहिली सेवा सुरू
प्रतिनिधी :- प्रतिनिधी प्रकाश दंडगव्हाळ

प्रतिनिधी हैदराबाद :- तुम्ही एटीएम मशीन मधून डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे काढता, पण याच एटीएम मशीन मधून डेबिट क्रेडिट कार्ड किंवा यूपीआय वापरून आता थेट सोन्याचे सिक्के तुम्हाला काढता आले तर? हैदराबादच्या एका कंपनीनं असे मशीन बनवले आहे. त्याचे उद्घाटन हे तिरुपती येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय मंदीर परिषदेत झाले आहे.
अनेक वेळा आपण मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरातून त्या मंदिराशी जोडलेल्या वस्तू घेत असतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन मंदिरांसाठी विशेष एटीएम मशीन सारखे दिसणारे मशिन बनविण्यात आले आहे ज्यातून आपण सोने आणि चांदीचे कॉइन डेबिट किंवा क्रेडिट कार्डने घेऊ शकतो.
तुमच्या जवळ असलेल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ने अथवा यूपीआयने तुम्ही हव्या त्या रकमेचे ट्रांन्झेक्शन केले की जसे एटीएममधून पैसे येतात तसे या मशीनमधून शिक्के येतात. यात विशेष बाब म्हणजे सोने आणि चांदीचे प्रति ग्रॅमचे भाव हे मशिन तुम्हाला दाखवते आणि त्यावरून आपल्या खिशाला परवडेल असा पर्याय आपल्याला वापरता येतो. पेमेंटची प्रोसेस संपल्यावर या मशीन मधून जीएसटी आणि मेकिंग चार्जसकट एक बिल बाहेर येते.
मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या तिरुपती येथे सुरू असलेल्या इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेंशनमध्ये या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. या मंदिर परिषदेला आलेल्या अनेक मंडळींनी या मशीनमधून आपल्याला हवे ते कॉइन एटीएममधून काढले.
सर्टिफाईड नंबर आणि हॉलमार्क
या एटीएमची संकल्पना मंदिरांसाठी करण्यात आली आहे. अनेक वेळा आपण मंदिरात सोने चांदी दान करतो किंवा भेट देताना दैवतांचे कोरीव असलेले शिक्के देतो. त्यामुळे हे मशीन ज्या मंदिरात असतील त्या त्या ठिकाणावरील देवतांचे रुप तुम्हाला या शिक्क्यांवर पाहायला मिळेल. सध्या तिरुपतीमध्ये भगवान वेंकटेश्वर आणि गोविंदराज स्वामींच्या रूपात हे कॉइन उपलब्ध आहे.
कोणत्याही दुकानात जाण्याची गरज नाही
कोणत्याही सोनाराच्या दुकानात न जाता सोने आणि चांदींची खरेदी करण्यात येत असल्याने खरे की खोटे? गॅरंटी काय? हॉलमार्क कुठे? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या गोष्टी लक्षात घेता अळट मधून बाहेर येणा-या कॉइनच्या पॅकेजिंगवर ट्रस्ट आणि प्यूरिटी असे लिहिण्यात आले आहे. तसेच सर्टीफाईड नंबरही पाहायला मिळत आहे. सोबतच हॉल मार्कही असल्याने याची पडताळणीही होते. अनेक जण या ठिकाणी आता हे शिक्के विकत घेताना पाहायला मिळत आहे. तर भविष्यातही अळट मशिन किती मंदिरात पाहायला मिळणार याचीही उत्सुकता आहे.
अखेर १४ ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनाची स्थानिक सुट्टी जाहीर
विभागीय आयुक्तांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार सन 2025 या वर्षासाठी नागपूर जिल्हयासाठी १० फेब्रुवारी २०२५ च्या आदेशानुसार विभागीय आयुक्त माधवी यांनी ३ स्थानिक सुटटया जाहिर केलेल्या होत्या यामध्ये दरवर्षीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त १४ ऑक्टोबर रोजी देण्यात येणारी स्थानिक सुट्टी वगळण्यात आली होती. त्यामुळे रोष होता.
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने उपायुक्त (सामान्य प्रशासन) प्रदीप कुलकर्णी यांची भेट घेऊन धम्मचक्र प्रवर्तन दिनाची स्थानिक सुट्टी देण्याची मागणी केली होती. त्यांनी याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते अखेर आज १८ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त यांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाची स्थानिक सुट्टी जाहीर केली त्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये आनंद व्यक्त केला आहे.
यापूर्वी विभागीय आयुक्तांनी सन २०२५ या वर्षासाठी ज्या स्थानिक सुट्टया जाहिर केलेल्या आहेत त्यामध्ये अक्षय तृतिया ३० एप्रिल, महालक्ष्मी पुजन १ सप्टेंबर व नरक चतुर्दशी २० ऑक्टोबरचा समावेश होता.