क्राईम न्यूजनाशिक शहर न्यूजनासिक क्राईम रिपोर्टमहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्य

योद्धा न्यूज !! मंदिराच्या दानपेटीत टाकली जळती काडी, सगळ्या नोटा जळून खाक

प्रतिनिधी अमोल क्षीरसागर YEN News :- खोडसाळपणा करणारा चिमुरडा सीसीटीव्हीत कैद

प्रतिनिधी नासिक :– मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील पैसै चोरी झाल्याचे प्रकार नेहमी घडत असतात. पण, नाशिकच्या सटाण्यात एक अजब प्रकार घडला आहे. गणपती मंदिराच्या दानपेटीत जळती काडी टाकल्याने दानपेटीतील नोटा जळून खाक झाल्या आहेत. एका अल्पवयीन मुलाने हा खोडसाळपणा केला आहे.

गणपती मंदिराच्या दानपेटीत जळती काढी टाकताना चिमुकला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. त्याने काढेपेटीतून काढी ओढून ती दानपेटीत टाकली त्यानंतर लगेचच धूर निघण्यास सुरु झाल्याचे सीसीटीव्हीत दिसते आहे. आग लागल्याने दानपेटीतील नोटा जळून खाक झाल्या आहे.

भाविक मोठ्या श्रद्धेने दानपेटीत दान टाकत असतात. त्यामुळे असा खोडसाळपणा कुणी करु नये अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या आहेत. हा प्रकार बघितल्यानंतर ग्रामस्थांनी व मंदिर प्रशासनाने संताप व्यक्त केला आहे.

नाशिकमध्ये मनसेने कर्नाटकच्या बसला काळे फासल

नाशिक – बेळगाव येथे कन्नड वेदिका रक्षक या संघटनेने महाराष्ट्रातील एसटीचे महाराष्ट्रीयन चालकांना वाहकांना तोंडाला काळे फासून मराठी भाषेचा निषेध केला आहे त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक येथे त्यांच्या कर्नाटक परीवहनच्या बसेसला काळे फासले तसेच बसेसवर ‘जय महाराष्ट्र, मनसे नासिक’ असो लिहून इशारा देण्यात आला. तसेच यातील वाहक मराठी असल्याने त्यांचा सन्मान करून त्यांना परत पाठवण्यात आले आहे.

मनसेच्या वतीने यापूर्वीही अशाच प्रकारे कर्नाटकाने महाराष्ट्रातील मराठी भाषिकांवर अन्याय केल्यावर आंदोलन करण्यात आले हेाते. आताही ठक्कर बाजार बस स्थानक येथे आंदेालन करण्यात आले.

याप्रसंगी शहराध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष आदी यांनी कर्नाटकचा निषेध करून बसला काळे फासले आणि कन्नड सरकारचा निषेध करून यापुढेही पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू असा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button