योद्धा न्यूज !! नासिक मखमलाबाद १ वर्षाच्या चिमुकलीची निर्गुण हत्या झाल्याचा आरोप चिमुकलीच्या आईने केला
प्रतिनिधी हरिष चव्हाण योद्धा एक्सप्रेस न्युज

प्रतिनिधी नासिक
नासिक मखमलाबाद चिमुकलीची निर्गुण हत्या,विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा केला खोटा दावा विकास हेमंत वळवी चिमुकलीचे वडील राहणार नासिक मखमलाबाद, विद्या विकास वळवी चिमुकलीची आई चिमुकलीची आई गेल्या सहा महिन्यापासून माहेरी राहत होती.चिमुकली वैष्णवी तिच्या वडिलांकडे होती.विकासला मुलगा हवा होता. त्या कारणावरून विद्या सोबत नेहमी भांडण होत होती.
दिनांक 10 मार्च 2025 रोजी साडेपाच वाजता चिमुकली विहिरीत पडून मृत्यू झाल्याची बातमी विद्याला 7:30 वाजता नांदगाव या ठिकाणी कळवण्यात आली. तोपर्यंत चिमुकलीचा मृत्युदेह कुठलाही पोलीस पंचनामा किंवा पोलीस सर्टिफिकेट न घेता पुरून देण्यात आला. विद्याला हा घातपाताचा संशय आल्याने. त्यांनी लागलीच नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये रीतसर कंप्लेंट नोंदवली.
परंतु त्या ठिकाणी त्यांना समाधानकारक न्याय न मिळाल्याने त्यांनी नासिक या ठिकाणी गंगापूर पोलीस स्टेशन सातपूर पोलीस स्टेशन म्हसरूळ पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन आपल्या चिमुकल्याच्या मारेकरांना अटक होऊन योग्य तो न्याय मिळावा यासाठी धडपड केली. परंतु त्यांची कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेण्यात आली नाही. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष योद्धा हेल्पिंग फाउंडेशन हरीश चव्हाण यांच्याशी संपर्क करून न्याय मिळावा यासाठी विनंती केली.
हरीश चव्हाण यांनी संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाळ यांची बोलून सर्व माहिती ही कल्पना दिली हो झालेला प्रकार सांगितला. ओ पी डी तिला न्याय कसा मिळवून देण्यात येईल त्या संदर्भात बोलणे झाले. योद्धा हेल्पिंग फाउंडेशनचे महाराष्ट्र सचिव श्री दिनेश साळवे यांच्याशी संपर्क करून आज दिनांक 12 मार्च 2025 रोजी म्हसरूळ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक यांनी हालचाल करून कोर्ट आदेश घेऊन. चिमुकलीला ज्या ठिकाणी पुरवण्यात आले होते त्या ठिकाणी. जाऊन चिमुकलीची बॉडी ताब्यात घेतली व सिविल हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम पुढच्या कारवाईसाठी हालचाल केली
पुढील तपास मसरूळ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हे करीत आहे