अहिल्यानगर जिल्हामहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यसामाजिक

योद्धा न्यूज !! जेष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर योगिता एक्सप्रेस न्युज

प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील योद्धा एक्सप्रेस न्युज अहिल्यानगर

सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाणबाबत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीनां पत्रकार सुरक्षा समिती वतीने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सत्कार केला जातोय पत्रकार सुरक्षा समिती चा राज्यस्तरीय पुरस्कार 2025 चा आदर्श पत्रकार म्हणून श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथील जेष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांना जाहीर केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे व सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी(बी एस), यांनी माहिती दिली आहे.

जेष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील हे विविध वृत्तपत्र तसेच विविध ऑनलाईन पोर्टल चे काम पहात असून अहिल्या नगर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक व इतर विषयावर त्यांचा चांगला अभ्यास असून सामाजिक बांधिलकी म्हणून ते पत्रकारिता करत आहेत

सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच प्रयत्न करत असून प्रशासन दरबारात दिनदुबळ्यांची बाजू मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या या कामाची दखल घेऊन पत्रकार सुरक्षा समिती चा 2025 चा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर केला आहे

 हेही वाचा 👇

पत्रकार सुरक्षा समितीचे वतीने जागतिक महिला दिन साजरा

पंढरपूर (प्रतिनिधी) दिनांक 18 – महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समिती शाखा पंढरपूर व कुमार प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून माजी नगराध्यक्शा सौ. साधनाताई भोसले, मनसेच्या सौ. माधुरी दिलीप धोत्रे, डॉक्टर सौ. वर्षा काणे, सौ स्मिता गणेश अधटराव, लोटस स्कूलच्या प्रिन्सिपल डॉक्टर जयश्री भोसले, सौ. विनया संकेत कुलकर्णी व सौ. रसिका कुमार वाघमोडे उपस्थित होत्या.


कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक कार्यकारी प्रदेशाध्यक्ष श्री. रामचंद्र सरवदे यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की – पत्रकार सुरक्षा समिती पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम अहोरात्र करीत आहे. सामाजिक बांधिलकी जपत जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम सुरक्षा समितीच्या वतीने घेण्यात येत आहे. समाजामध्ये होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्याचे काम पत्रकार सुरक्षा समिती मार्फत केले जाते असेही ते म्हणाले.
महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये आदर्श माता म्हणून – मंगलताई शहा, आदर्श शिक्षिका म्हणून – सुनिता धनंजय मोहोळकर, उत्कृष्ट खेळाडू – ज्योती बनसोडे, समाजभूषण – सौ दुर्गा माने, प्रसिद्ध अधिवक्ता – एडवोकेट पूनम अभंगराव, कला भूषण – कुमारी मैना काळे, कर्तुत्ववान महिला म्हणून रणरागिनी पुरस्कार – संगीता थोरात-सोळंकी, दामिनी पुरस्कार – कुसुम क्षीरसागर ( पोलीस), उत्कृष्ट कर्मचारी – लक्ष्मी वायदंडे, सफाई कर्मचारी – लता विश्वनाथ काळुंगे, सामाजिक कामात योगदान दिल्यामुळे डॉक्टर अंजली महेश बडवे यांचा शाल, गुलाबपुष्प, ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सौ विनया संकेत कुलकर्णी, माजी नगराध्यक्शा सौ. साधनाताई भोसले आदींनी आपली मनोगते व्यक्त केली


याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉक्टर सौ. वर्षा काणे म्हणाल्या – समाजाचे काहीतरी देणे लागते या नात्याने पत्रकारांनी महिला भगिनींचा यथोचित सन्मान सोहळा संपन्न करून सामाजिक बांधिलकी जपली. या कार्यक्रमासाठी मला प्रमुख अतिथी म्हणून माझा सन्मान केला व समाजातील सर्व स्तरातील विशेष कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करून पत्रकारांनी एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला.


याप्रसंगी पत्रकार बांधवांच्या सौभाग्यवतींचा यथोचित सन्मान मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रवी शेवडे यांनी केले. आभार प्रदर्शन रसिका वाघमोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री रामचंद्र सरवदे, रवींद्र शेवडे, रामकृष्ण बिडकर, लखन साळुंखे, नागेश काळे, दत्ताजीराव पाटील, विश्वास पाटील, राहुल रणदिवे, कुमार वाघमोडे व पत्रकार सुरक्षा समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

 हेही वाचा 👇👇

ब्रिलियंट टाइम्सचे इम्तियाज अक्कलकोटकर यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर 

सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाणबाबत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीनां पत्रकार सुरक्षा समिती वतीने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सत्कार केला जातोय पत्रकार सुरक्षा समिती चा राज्यस्तरीय पुरस्कार 2025 चा आदर्श पत्रकार म्हणून ब्रिलीयंट टाईम्स चे जेष्ठ पत्रकार इम्तियाज अक्कलकोटकर यांना जाहीर केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे व सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी(बी एस), यांनी माहिती दिली आहे. ब्रिलियंट टाइम्सचे इम्तियाज अक्कलकोटकर पत्रकारिता करत करत सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत नेहमीच धावून जातात संजय गांधी निराधार योजना जाती दाखला उत्पन्न दाखला रहिवासी दाखला रेशन कार्ड यासह विविध शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोवण्या चे ते काम करत असून पत्रकारितेबरोबर एक सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे बिलियन टाईम्सचे इम्तियाज अक्कलकोट कर यांच्या कामाची दखल घेऊन पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार जाहीर केला असून ज्येष्ठ पत्रकार इम्तियाज अक्कलकोटकर यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याने पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सच्चा व प्रामाणिक पत्रकाराला आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याने पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button