महाराष्ट्र राज्यमुंबई

योद्धा न्यूज !! आयपीएल बघणे एसटी चालकास पडले महागात

एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खाजगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहनं चालवल्या प्रकरणी बडतर्फ केले असून संबंधित खाजगी संस्थेला ५ हजार रुपये इतका दंड ठोठावला आहे.

प्रतिनिधी मुंबई योद्धा एक्सप्रेस न्युज

प्रतिनिधी मुंबई :- आयपीएल बघणे एसटी चालकास पडले महागात बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणा-या एका खासगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ करत संबंधित खासगी कंपनीला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार ही कारवाई एसटी महामंडळाने केली आहे.

दादर येथून स्वारगेट (पुणे) साठी निघालेल्या खासगी ई-शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळाजवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत असल्याचा प्रकार २१ मार्च रोजी घडला होता. संबंधित बसमधून प्रवास करणा-या प्रवाशांनी याचे चित्रीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले.

याबाबत मंत्री सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिका-यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एसटीच्या स्थानिक अधिका-यांनी संबंधित खासगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहने चालवल्या प्रकरणी बडतर्फ केले असून संबंधित खासगी संस्थेला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button