योद्धा न्यूज!!निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेची गरुड भरारी निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटना निपाणी
प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेची गरुड भरारी
निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटना निपाणी संलग्न राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन
प्रतिनिधी कोल्हापूर :- न्यू दिल्ली आणी उत्तर कर्नाटक रिक्षा चालक सुरक्षा संघ हुबळी यांच्या गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित असलेल्या रिक्षा चालक मालक यांच्या साठीच्या लेबर कार्ड सुविधा मिळाव्यात या साठी होत असलेल्या मागणीस अखेर घवघवीत यश मिळाले असून कर्नाटक राज्य मोटार परिवहन विभाग आणी इतर सामाजिक सुरक्षा कल्याण मंडळ आणी कामगार मंत्री श्री संतोष लाड सर यांनी आम्हाला आश्वासन दिल्या प्रमाणे सर्व रिक्षा टॅक्सी ट्रक ट्रान्सपोर्ट बॅच धारक चालक यांना या स्कीममधून एक सुरक्षा कवचचदिलेले आहे.
त्याबद्दल कामगार मंत्री मा.श्री संतोष लाड आणी वरील सर्व निगम यांचे खूप खूप आभार
निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटने कडून संघटनेच्या सर्व सभासद यांना कर्नाटक राज्य मोटार परिवहन आणी इतर संबंधीत असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा बोर्ड आणी कल्याण मंडळ कडून मिळणाऱ्या सोई सुविधाचे स्मार्ट कार्ड
संघटनेच्या प्रधान कार्यालय मध्ये राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे कर्नाटक राज्याचे अध्यक्ष आणी निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे कर्तव्य दक्ष अध्यक्ष श्री गजानन खापे यांच्या शुभहस्ते आणी बेळगाव उपाध्यक्ष श्री प्रवीण झळके सेक्रेटरी श्री दीपक जोतावर आणी सर्व संचालक यांच्या हस्ते कार्डचे वितरण करणेत आले असून या सर्व स्कीम्स देखील संघटनेच्या सर्व सभासद यांना अध्यक्ष श्री गजानन खापे हे मिळवून देत आहेत
रिक्षा टॅक्सी चालक यांना या कार्डमुळे भरपूर फायदे मिळत असून एक आर्थिक पाठबल देखील मिळाले असून वायोवृद्ध रिक्षा टॅक्सी चालक यांना पेन्शन देखील मिळत असून हे कार्ड ज्या रिक्षा टॅक्सी चालक यांना मिळाले आहे त्याना अपघाती अपंगत्व आलेस 2 लाख पर्यंत अनुदान मिळेल अपघाती निधन झालेस 5 लाख रुपये त्यान्च्या वारसास मिळतील मयत निधी म्हणून उत्तर कार्यासाठी 10 हजार ते 25 हजार रुपये अचानक आजारपण किंवा छोटे ऑपेरेशन साठी दवाखाना खर्च 50 हजार रुपये मिळणार त्यान्च्या मुलांना शिक्षणासाठी 1 ली पासून पदवीपर्यंत शिक्षण साठी 3 हजार पासून 25 हजार रुपये स्कॉलरशिप मिळत आहे त्याचबरोबर कार्ड धारक चालकाच्या मुलांच्या विवाहाला देखील निधी मिळणार असून या कार्ड पासून अनेक विविध सरकारी स्कीम्स तसेच अनेक लाभ देखील मिळणार असून याचा लाभ सर्व बॅच धारक रिक्षा टॅक्सी चालक मालक यांनी घ्यावा अशी विनंती अध्यक्ष श्री गजानन खापे यांनी केलेली आहे
हे कार्ड मिळवून देणेसाठी आणी खरोखरचं रिक्षा चालक टॅक्सी चालक यांना होणाऱ्या त्रासाची जाणीव ठेवून रिक्षा चालक यांच्या आणी रिक्षा चालक यांच्या सर्व कुटुंबाचा भविष्याचा अगदी जातीने विचार करून हे सुरक्षा कवच कार्ड स्वरूपात मिळवून दिलेल्या अश्या सर्वांचेच निपाणी शहर मध्यवरती रिक्षा चालक मालक संघटनेकडून खूप खूप अभिनंदन आणी आमची रिक्षा संघटना आपल्या सर्वांची सदैव ऋणी राहील
उपस्थित संघटनेचे सर्व सभासद व संचालक तसेच अकोळ मालवाहतूक संघटना संकेश्वर रिक्षा चालक संघटनेचे सभासद उपस्थित होते.