कोल्हापूर जिल्हाकोल्हापूर शहरधार्मिकमहाराष्ट्र राज्यसामाजिक

योद्धा न्यूज !! एक मुखानं बोला, बोला, जय हनुमान!; कोल्हापुरात भक्तीपूर्ण वातावरणात हनुमान जयंती साजरी

प्रतिनिधी किरण पाटील मामा

प्रतिनिधी किरण पाटील मामा :-अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला, बोला जय हनुमान’अशा गजरात कोल्हापूर शहरात हनुमान जयंती.कोल्हापूर शहर मधील मंगळवार पेठ येथील नवसाला पावणारा पश्चिम मुकी हनुमान मंदिर. हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साह आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला तसेच दिवसभर प्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.

सोन्या मारुती चौक, उभा मारुती चौक, राजारामपुरी, संभाजीनगरसह तुळजाभवानी कॉलनी आदी उपनगरात सकाळी जन्मोत्सव, भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांसह भक्तांना सुठंवडा, प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी हनुमान भक्तांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.उभा मारुती चौकातील मारुती मंदिरामध्ये सकाळी महिलांच्या हस्ते जन्मकाळ सोहळा झाला. शनिवार पेठेतील सोन्यामारुती चौक सेवा मंडळातर्फे सकाळी जन्मकाळ व त्यानंतर दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात येणार . श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम जय जय श्रीराम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button