नाशिक शहर न्यूजमहाराष्ट्र राज्यमाहिती तंत्रज्ञानसामाजिक

योद्धा न्यूज !! कारमध्ये एसी कमी-जास्त केल्यावर मायलेजवर परिणाम होतो का? जाणून घ्या सविस्तर माहिती

प्रतिनिधी हरीश चव्हाण नासिक योद्धा एक्सप्रेस न्युज

प्रतिनिधी नासिक
सध्या देशभरात तापमान झपाट्याने वाढत आहे. उन्हाळ्याच्या काळात अनेक जण प्रवास करतात आणि अशा वेळी एसीचा वापर अपरिहार्य ठरतो. त्यामुळे कारमधील फॅनची स्पीड वाढवणे आवश्यक वाटते.

Driver hand tuning air ventilation grille, fresh air is coming out

पण प्रवासादरम्यान अनेकांना वाटतं की, एसीच्या फॅनची स्पीड कमी केल्याने गाडीचं मायलेज वाढतं का? जर हा प्रश्न तुमच्याही मनात असेल, तर याचं उत्तर आज आपण शोधूया. गाड्यांमधील एसी ही एक आधुनिक व सोयीची सुविधा आहे, जी ड्रायव्हर आणि प्रवाशांना उकाड्यापासून आराम देते. पण या आरामाचा इंधन वापर आणि मायलेजवर काय परिणाम होतो, हे समजून घेणं गरजेचं आहे.

एसी कसा काम करतो?

कारमधील एसी सिस्टीम पूर्णपणे इंजिनवर आधारित असते. यामध्ये मुख्य भूमिका असते कंप्रेसरची, जो इंजिनला बेल्टद्वारे जोडलेला असतो. एसी सुरू केल्यावर कंप्रेसर रेफ्रिजरंटवर दाब टाकतो, ज्यामुळे ते थंड होतं. हे थंड रेफ्रिजरंट नंतर इव्हॅपोरेटर कॉईलमधून जातं. ब्लोअर मोटर त्या थंड कॉईलवर हवा फेकते, ज्यामुळे केबिनमध्ये थंड हवा पोहोचते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कंप्रेसर चालू ठेवण्यासाठी इंजिनला जास्त ऊर्जा लागते आणि त्यामुळेच इंधनाचा वापर वाढतो.

एसीची हवा कमी-जास्त करण्याचा परिणाम
ब्लोअरची स्पीड वाढवली किंवा कमी केली, तरी त्याचा कंप्रेसरच्या कार्यक्षमतेवर थेट मोठा परिणाम होत नाही. कंप्रेसर चालू असेल तर तो रेफ्रिजरंटला कंप्रेस करतो; अन्यथा तो बंद होतो. फक्त ब्लोअरची स्पीड बदलल्याने केबिनमध्ये येणाऱ्या थंड हवेमध्ये बदल होतो, पण कंप्रेसरवर भार फारसा बदलत नाही.

तथापि, जेव्हा तुम्ही ब्लोअरचा वेग वाढवता, तेव्हा ब्लोअर मोटर जास्त वीज वापरते. ही वीज कारच्या इलेक्ट्रिकल सिस्टीममधून येते, जी अल्टरनेटरद्वारे चार्ज होते. अल्टरनेटर चालवण्यासाठी इंजिनला थोडी अधिक मेहनत घ्यावी लागते. म्हणून, खूप जास्त ब्लोअर स्पीड असल्यास इंजिनवर थोडा अतिरिक्त भार येतो, पण तो कंप्रेसरच्या तुलनेत खूपच कमी असतो.

ही गोष्ट लक्षात ठेवा

जर तुम्ही एसीचं तापमान खूपच कमी ठेवलं आणि ब्लोअरचा वेगही कमी ठेवला, तर केबिन थंड होण्यास जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे कंप्रेसरला जास्त वेळ चालू राहावं लागेल, आणि यामुळे इंधन वापर वाढू शकतो. पण जर तुम्ही तापमान थोडंसं जास्त ठेवून ब्लोअरचा वेग वाढवला, तर केबिन लवकर थंड होईल आणि कंप्रेसर कमी वेळासाठी चालेल म्हणजेच इंधनाचा वापर थोडा कमी होऊ शकतो. मात्र याचा परिणाम बाहेरील तापमान आणि गाडीच्या इन्सुलेशनवरही अवलंबून असतो.
सारथी योद्धा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत सखा माझा सारथी एपिसोड 2
सर्वांनी एकदा नक्की बघा लाईक सबस्क्राईब व शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button