नाशिक शहर न्यूजमहाराष्ट्र राज्यराजकीयसामाजिक

योद्धा न्यूज!!नाशिकमध्ये उड्डाणपुलाच्या खांबांवर साकारतेय श्रीराम जीवनगाथा

प्रतिनिधी विशाल पाटील नाशिक

नाशिकमध्ये उड्डाणपुलाच्या खांबांवर श्रीराम जीवनगाथा चित्रांच्या रुपानं साकारण्यात येत आहे. यात सुमारे ३८ रामचरत्रातील चित्रे शोभा वाढवणार आहेत.

उड्डाणपुलाच्या खांबांवर साकारतेय श्रीराम जीवनगाथा

नाशिक –येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-मुंबई महामार्गावरील उड्डाणपूलाच्या खांबांवर श्रीराम जीवनगाथा साकारण्यात येत आहे. या निमित्ताने कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना चित्रांच्या माध्यमातून श्रीरामाच्या जीवनगाथेचे दर्शन घडणार आहे.


प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरत असतो. या कुंभमेळ्यात लाखो साधू महंत तसंच हजारो भाविक पवित्र गोदास्नान करण्यासाठी येत असतात. यावेळी 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असून यासाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. तसंच काही सामाजिक संस्था देखील या कामासाठी पुढाकार घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून नाशिक-मुंबई महामार्गावरील उड्डाणपूलाच्या 38 खांबांवर चित्रांच्या माध्यमातून श्रीराम जीवनगाथा साकारण्यात येत आहे. या माध्यमातून कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना श्रीरामाच्या जीवनगाथाचे दर्शन घडणार आहे.

श्रीरामांच्या जीवनगाथाचे हे साकारणार प्रसंग प्रभू राम महर्षी वाल्मीकांकडे गुरू विद्या घेताना, त्रिटिका राक्षस वध, सीता जन्म, सीता स्वयंवर, कैकयी दशरथास वचन मागताना, राम लक्ष्मण सीता वनवासाला जाताना, श्रावण बाळाचा मृत्यू, दशरथास शाप, दशरथ मृत्यू, राम भरत मिलाप, सिंहासनावर श्रीरामांच्या पादुका ठेवून प्रणाम करताना, पंचवटीत कुटिया बांधताना, शूर्पणखा राम लक्ष्मणाकडे लग्नासाठी विनंती करताना

, शूर्पणखाचे  नाक कापताना, सीता रामास सुवर्णमृग दाखवताना, लक्ष्मण रेषा आखताना, सीता रावणास भिक्षा देताना, पुष्पक विमानातून सीताचे अपहरण, जटायूचे पंख छाटताना रावण, राम लक्ष्मणाकडून जटायू विचारपूस, शबरीची भेट, हनुमानाची सूर्याकडे झेप, हनुमानाचे विशाल रूप, हनुमान समुद्रावरून झेप घेताना, हनुमान अशोक वटीकेत सीतेला रामाची अंगठी देताना, हनुमानाच्या शेपटीला आग, लंका दहन, सेतू निर्मिती, कुंभकर्ण वध, हनुमान संजीवनी आणताना, इंद्रजीताचा वध, राम रावण युद्ध, अग्निपरीक्षा, आयोध्याकडे जाताना, हनुमान छातीमध्ये राम सीता दाखवताना असे विविध प्रसंग चित्रांच्या माध्यमातून साकारण्यात येत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button