Breaking newsअहिल्यानगर जिल्हाधार्मिकमहाराष्ट्र राज्यशिर्डीसामाजिक

योद्धा एक्सप्रेस न्युज!!अबब..साई संस्थानच्या तिजोरीत सुमारे ५०० किलो सोने जमा

श्री. हरीश चव्हाण प्रतिनिधी नाशिक

श्री हरीश चव्हाण प्रतिनिधी नाशिक
मुख्य संचालक श्री प्रकाश दंडगव्हाळ, योद्धा एक्सप्रेस न्युज
योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष

योद्धा एक्सप्रेस न्युज!!अबब..साई संस्थानच्या तिजोरीत सुमारे ५०० किलो सोने जमा

शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांची संख्या लाखोंमध्ये आहे. साई चरणी भक्तांकडून नेहमीच दान-धर्म केला जातो. आता याच दानामुळे साई संस्थानच्या तिजोरीत सुमारे ५०० किलो सोने जमा झाले असून यात आणखी वाढ होत आहे. त्यामुळे आता सोने कुठे ठेवायचे असा प्रश्न उपस्थित होतो.

साई संस्थानच्या तिजोरीत पाचशे किलो सोने जमा झाले आहे. यात दागिने स्वरूपातील सोने अधिक आहे. सोन्याच्या भावात गेल्या काही वर्षात दुपटीने वाढ झाली आहे, त्यामुळे साई संस्थानच्या संपत्तीत तब्बल अडीचशे कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आता साई संस्थानकडे हे सोने साठवायला जागा कमी पडत आहे. स्टेट बँकेकडे सोने ठेवायला दिले, तर त्यावर अडीच टक्के व्याज मिळू शकते. परंतु ही बाब न्यायप्रविष्ट झाल्याने यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता ही परिस्थिती जर अशीच राहिली तर साई संस्थानला देणगी स्वरूपात येणारे सोने साठवण्यासाठी विस्तारीत जागा तयार करावी लागेल.

या पाचशे किलो सोन्याच्या साठ्यात शंभर किलो वजनाचे साई सिंहासन समाविष्ट आहे. याशिवाय, सुबक आणि मौल्यवान दागिन्यांचाही समावेश असून हे दागिने सुरक्षित ठेवावेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. सुमारे अडीचशे किलो सोने वितळवण्या योग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी सुमारे १४० किलो वजनाच्या वस्तू वितळवून त्यापासून सुवर्ण नाणी तयार करण्याचा निर्णय साई संस्थानने काही वर्षांपूर्वी घेतला होता, ज्याला उच्च न्यायालयाचीही मान्यता मिळाली होती. मात्र, या निर्णयाला श्रीरामपूर येथील ऍड. संदीप कुलकर्णी यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे.

ऍड. संदीप कुलकर्णी यांच्या निरीक्षणानुसार, साई संस्थानने आजवर तीन वेळा आपल्याकडील सोन्याच्या वस्तू वितळवून सुवर्ण नाणी तयार केली आहेत. ही नाणी अडीच, पाच, दहा आणि वीस ग्रॅम वजनाची असून एकूण सुमारे सदतीस किलो वजनाचे सोने या स्वरूपात वितरित करण्यात आले. त्यापैकी सुमारे पाच किलो वजनाची नाणी अद्याप शिल्लक आहेत. दरवर्षी केवळ दोन ते तीन किलो सोन्याच्या नाण्यांचीच विक्री होते. हे लक्षात घेता, नव्याने तयार करण्यात येणा-या नाण्यांची विक्री होण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यासंबंधित जोखीमही वाढू शकते.

ही बातमी वाचा 👇

योद्धा न्यूज!!शिर्डीत साई भक्तांना आता देणगीच्या प्रमाणात सुविधा, साईबाबा संस्थानाचे नवीन देणगी धोरण
14 May, 2025, 07:12 AM

शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-परदेशातून येणारे साईभक्त मोठ्या श्रद्धेने साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करतात. या देणगीदार साईभक्तांच्या सेवा-सुविधांत वाढ करण्यासाठी सुधारित देणगी धोरणास संस्थानच्या तदर्थ समितीने मान्यता दिली आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

साईबाबा संस्थानचे प्रमुख चार उत्सव सोडून देणगीदार साईभक्तांना त्यांच्या देणगीच्या श्रेणीनुसार विविध प्रकारच्या सेवा-सुविधा, विशेषतः दर्शन-आरती सुविधा, बहुमान म्हणून शाल व फोटो, साई चरित्र, उदी- लाडू प्रसाद, भोजन पास इ. दिले जाणार आहेत. या धोरणातून साईभक्तांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा संस्थानचा प्रयत्न आहे. साईबाबांच्या समकालीन भक्तांच्या कुटुंबातील सदस्यांचाही योग्य सन्मान केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या सुधारित सेवा-सुविधा पुढीलप्रमाणे- १० ते २५ हजारांपर्यंतचे दान देणाऱ्या साईभक्तास एका वेळेस कुटुंबातील ५ सदस्यांसाठी आरती पास, २५ ते ५० हजारांपर्यंतचे दान देणाऱ्यास दोन वेळेस कुटुंबातील ५ सदस्यांसाठी आरती व दर्शन पास, ५० हजार ते १ लाखापर्यंतचे दान देणाऱ्यास दान करतेवेळी कुटुंबातील ५ सदस्यांसाठी दोन व्हीआयपी आरती पास.रु. १ लाखावर दान देणाऱ्यास वर्षामध्ये २ व्हीआयपी आरती पास, तसेच नंतरच्या वर्षात त्यांच्या दानाप्रमाणे प्रति वर्ष १ व्हीआयपी आरती पास मिळेल. त्या वेळी सशुल्क दर्शन रांगेतून कुटुंबाच्या ५ सदस्यांसाठी तहहयात वर्षातुन १ वेळेस मोफत दर्शन सुविधा देऊन सन्मान केला जाईल. १० ते ५० लाखपर्यंत दान देणाऱ्यास देणगी प्रमाणात प्रत्येक वर्षी २ व्हीआयपी आरती पास व त्यांच्या कुटुंबातील ५ सदस्यांना तहहयात वर्षातून एक वेळेस मोफत प्रोटोकॉल दर्शन दिले जाईल. वर्षात एकवेळेस श्री साईबाबांना वस्त्र परिधान करण्यास वस्त्र देण्याची संधी दिली जाणार आहे.

रु. ५० लाख आणि त्याहून अधिकचे दान देणाऱ्या साईभक्तास तहहयात ५ सदस्यांच्या कुटुंबासाठी प्रति वर्ष ३ व्हीव्हीआयपी आरती पास मिळणार आहेत. या देणगीदार साईभक्तासह कुटुंबातील ५ सदस्यांना प्रत्येक वर्षी २ प्रोटोकॉल व्हीव्हीआयपी दर्शन पास मिळतील. या सर्व देणगीदारांचा संस्थान यथोचित सन्मान करणार आहे.

सुविधेसाठी संगणक प्रणाली
सुधारित देणगी धोरणाच्या अनुषंगाने देणगीदारांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तंत्रज्ञान (सॉफ्टवेअर) विकसित करण्याचे काम झाल्यानंतर देणगीदारांची सर्व माहिती त्यामध्ये भरली जाईल. त्यानुसार प्रत्येक देणगीदाराला स्वतंत्र कार्ड दिल्यानंतर त्याआधारे त्यांना या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. संस्थानच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर त्याची माहिती मिळेल. देणगीदारांनी शिर्डीला येण्याअगोदर १ महिना संस्थानला कळविल्यास त्यांना या सुविधेचा फायदा देण्यास संस्थान प्रशासन तत्पर असेल. या नवीन देणगी धोरणाची लवकरच अंमलबजावणी केली जाईल. – गोरक्ष गाडिलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान, शिर्डी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button