योद्धा एक्सप्रेस न्यूज!!पुणे-सोलापूर मार्गावर पाटस येथे ढगफुटी ? , Innova कार वाहून गेली…Video
श्री किरण पाटील मामा प्रतिनिधी कोल्हापूर
महाराष्ट्रात पावसाचा धुमाकुळ सुरु आहे. पुणे सातारा,आजबाजूच्या भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका पुणे, सोलापूर, सांगली, सातारा या भागाला बसला आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागाला पावसाचा मोठा फटका बसला आहे. येथील पुणे – सोलापूर महामार्गावर पाटस येथे ढगफूटी सदृश्य पाऊस पडल्याने रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला पुणे- सातारा महामार्गावर माती खचून क्रॅक पडल्याची घटना घडल्याने वाहनचालकांच्या समोर संकट उभे राहिले होते. त्यामुळे घाटातून कार चालवणे रिस्की झाले असतानाच पुणे – सोलापूर महामार्गावर पावसाच्या माऱ्याने पाणी तुंबून त्यात इनोव्हा कार वाहून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कोकणात आणि आजूबाजूच्या प्रातांत येत्या दोन दिवसात मान्सून सक्रीय होऊन जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा वेध शाळेने दिला आहे. रायगड जिल्ह्याला तर मोठा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशात आठवड्याच्या सुरुवातीला जोरदार पावसाने पुणे- सोलापूर महामार्गावर पाटस येथे अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळ्याने पाण्याचा पुर येऊन त्यात एक इनोव्हा कार वाहून गेल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायलर होत आहे. इनोव्हाला वाचवण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल झाला आहे