योद्धा एक्सप्रेस न्युज!!एसटीची पुरुषांसाठी ‘लवचिक भाडे’ योजना
मुख्य संचालक प्रतिनिधी श्री प्रकाश दंडगव्हाळ

YVCM Helping Foundation NGO
योद्धा वाहन चालक-मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाळ
योद्धा एक्सप्रेस न्युज!!एसटीची पुरुषांसाठी ‘लवचिक भाडे’ योजना
एसटीच्या प्रवासात आता पुरूषांनाही विशेष सवलत मिळणार आहे, याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यासाठी एसटी महामंडळ प्रवाशांसाठी ‘लवचिक भाडे’ (फ्लेक्सी भाडे) योजना सुरू करणार आहे. याचा अर्थ कमी गर्दीच्या महिन्यांत प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी तिकिटांचे दर सुमारे १५% कमी केले जातील.
एसटी महामंडळाकडून रविवारी, १ जून रोजी ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त राज्य परिवहन (एसटी) बसेसमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांना कमी गर्दीत कमी भाडे देण्याची संधी मिळणार आहे. या निमित्ताने परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक या योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या योजनेत, महसूल वाढवण्यासाठी महामंडळाने ही योजना सुरू करण्याची तयारी केली होती.
सर्वसाधारणपणे जुलै ते सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च या महिन्यांत प्रवाशांची संख्या कमी असते. प्रवासी कमी असले तरी खर्च तेवढाच असतो. त्यामुळे एसटीच्या वरिष्ठ अधिका-यांना वाटते की ही योजना प्रवाशांची संख्या वाढवण्यास उपयुक्त ठरेल.
भाडे किती कमी होईल?
या योजनेनुसार, उदाहरणार्थ दादर ते स्वारगेट ई-शिवनेरी बसचे तिकीट ६०० रुपये आहे. परंतु कमी गर्दीच्या हंगामात जर तुम्ही आगाऊ तिकीट बुक केले तर तुम्हाला हे तिकीट ५१० रुपयांपर्यंत मिळू शकते. एसटीने प्रवास करणे सुरक्षित मानले जाते आणि लोक त्यावर विश्वास ठेवतात, त्यामुळे प्रवाशांना एसटीकडे आकर्षित होण्याची अपेक्षा आहे.
खाजगी बस चालकांना फायदा
या योजनेसंदर्भात एसटीच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, कमी गर्दीच्या वेळी खाजगी बस चालक त्यांचे भाडे कमी करतात. प्रवाशांना खाजगी बसमध्ये सौदेबाजी करण्याची संधी देखील मिळते. म्हणूनच बरेच लोक एसटीऐवजी खाजगी बसमध्ये प्रवास करतात. एसटीला या प्रवाशांनी पुन्हा एसटीमध्ये प्रवास करावा अशी इच्छा आहे, म्हणून ही योजना सुरू केली जात आहे. ‘लवचिक भाडे’ योजना सुरू झाल्यानंतर आगाऊ आरक्षण करणा-या प्रवाशांना या योजनेचा लाभ मिळेल.
फ्लेक्सी फेअर योजना
राज्यात खासगी बसचालक -मालक कमी गर्दीच्या काळामध्ये खासगी ट्रॅव्हल्सचे दर कमी करतात. खासगी बससाठी भाव कमी करण्यासाठी मुभा प्रवाशांना असते. त्यामुळे प्रवासी एसटीच्या तुलनेत खासगीने प्रवास करतो. हा प्रवासी वर्ग पुन्हा एसटीकडे आणण्यासाठी महामंडळाची योजना फायदेशीर ठरणारी असल्याचे वरिष्ठ एसटी अधिकारी सांगतात.