योद्धा एक्सप्रेस न्यूज!!बकरी ईद निमित्ताने ठाणे पोलिसांचा बंदोबस्त; गो-रक्षक, शांतता समितीच्या बैठका
प्रतिनिधी:- समीर सनदी कोल्हापूर

प्रतिनिधी समीर सनदी महाराष्ट्र मेडिया अध्यक्ष
योद्धा एक्सप्रेस न्यूज!!बकरी ईद निमित्ताने ठाणे पोलिसांचा बंदोबस्त; गो-रक्षक, शांतता समितीच्या बैठका
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. भिवंडी आणि ठाणे शहरात बकरी ईदच्या दिवशी ५०० हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. समाजमाध्यमांवरही पोलिसांचे लक्ष आहे. शहरातील शांतता समिती, गो-रक्षक यांच्या बैठका देखील घेण्यात आल्या. भिवंडी आणि ठाणे महापालिकेकडूनही भिवंडी आणि मुंब्रा, शिळ डायघर भागात विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडी, मुंब्रा आणि ठाण्यातील राबोडी हे मुस्लिम बहुल परिसर आहेत. याठिकाणी बकरी ईदच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आतापासून खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. भिवंडी शहरातील नारपोली, भिवंडी शहर, भोईवाडा, निजामपूरा, शांतीनगर, कोनगाव तसेच ठाण्यातील मुंब्रा, शिळ-डायघर आणि राबोडी पोलीस ठाण्यात पोलिसांनी शांतता समितीच्या बैठक घेतल्या. नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय, या सर्वच भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच गो-रक्षकांच्या देखील बैठका पोलिसांनी घेतल्या. वाहतुक पोलिसांकडूनही बकरी ईदच्या दिवशी ठिकठिकाणी वाहतुक बदल लागू केले जाणार आहेत.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून या भागात ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. तसेच ७० अधिकारी आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्याही तैनात असतील.
भिवंडीत ५६ ठिकाणी कुर्बानी तयार करण्याचे नियोजन आहे. तसेच, या केंद्रांवर २०० टेम्पो, १४ जेसीबी, ११ जीप, तीन क्रेन इतक्या वाहनांची व्यवस्था महापालिकेने केले आहे. तसेच कुर्बानीनंतर तेथील भागाची स्वच्छता करण्याकरिता २५ पाण्याचे टँकर उपलब्ध असणार आहे. कुर्बानीपुर्वी जनावरांची तपासणी करण्याकरिता पशुवैद्यकीय विभागाकडून ९६ पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन देण्यात आले आहे असे भिवंडी महापालिकेने स्पष्ट केले.
भिवंडी आणि मुंब्रा भागात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती, गो-रक्षकांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह इतर बंदोबस्ताचेही नियोजन आहे. – विनायक देशमुख, अपर पोलीस आयुक्त, (पश्चिम विभाग) ठाणे पोलीस.
🔥ही बातमी ही वाचा 👇👇👇👇👇
प्रतिनिधी समीर सनदी कोल्हापूर
योद्धा एक्सप्रेस न्यूज!! विशाळगडावर कुर्बानीला हायकोर्टाची परवानगी, बकरी ईदसाठी दर्गा ट्रस्टकडून याचिका
कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावरील हजरत पीर मलिक रेहान दर्गा येथे बकरी ईदनिमित्त ७ जून रोजी व उरसानिमित्त ८ ते १२ जून दरम्यान भाविकांना प्राण्यांची कुर्बानी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची मंगळवारी सुनावणी झाली.
विशाळगड किल्ल्यावर पशुबळी देण्यास मनाई आदेश लागू करण्यात आल्याने त्याविरोधात दर्गा ट्रस्टतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ॲड. सतीश तळेकर व ॲड. माधवी अय्यपन यांनी याचिकादारांची बाजू मांडली. तर, सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील पी.पी. काकडे व ॲड. कविता सोळुंके यांनी काम पाहिले. दर्ग्यापासून सुमारे १.४ किमी अंतरावर खासगी जागेत बंदिस्त ठिकाणी कुर्बानी दिली जाईल, असे याचिकादारांच्या वतीने सांगण्यात आले.
खंडपीठाने दोन्ही बाजू ऐकून ७ ते १२ जून दरम्यान कुर्बानी करण्यास परवानगी दिली आहे. गतवर्षी याच स्वरुपाची याचिका उच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. त्यावेळी दिलेल्या निकालाप्रमाणे यंदाही कुर्बानी देता येईल, मात्र निकालपत्रात दिलेल्या सर्व अटींची पूर्तता होणे गरजेचे आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. सार्वजनिक जागी किंवा खुल्या जागी कुर्बानी न करता गट १९ येथील मुबारक मुजावर यांच्या खासगी, बंदिस्त जागेत करावी, अशी यामधील प्रमुख अट आहे.