Breaking newsमहाराष्ट्र राज्यमुंबई

योद्धा एक्सप्रेस न्युज!! मुंबई रेल्वे असिसिडेन्ट : फुटबोर्डवर उभा राहून प्रवास, बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या अन् आठजण खाली पडले, मुंबई रेल्वे अपघाताची स्टार्ट टू एंड स्टोरी

प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

मुंबई रेल्वे असिसिडेन्ट : मुंबईत सोमवारी सकाळी भयानक रेल्वे अपघात घडला. दोन लोकल ट्रेनमधील प्रवाशी एकमेकांना धडकून ट्रेनमधून खाली पडले, पाच प्रवाशांचा मृत्यू

मुंबई लोकल ट्रेन असिसिडेन्ट : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून काही अंतरावर झालेल्या रेल्वे अपघातात सोमवारी पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. मध्य रेल्वेमार्गावरील दिवा आणि मुंब्रा या स्थानकांदरम्यान सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. दोन लोकल ट्रेन आजुबाजूने जास्त असताना या ट्रेन्सच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि त्यामुळे आठ जण रेल्वे ट्रॅकवर पडल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आज सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान एक लोकल ट्रेन कसाऱ्याच्या दिशेने आणि दुसरी सीएसएमटीला जात होती. या दोन्ही लोकल ट्रेन आजुबाजूच्या ट्रॅकवरुन जात होत्या. या दोन्ही ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे अनेक प्रवासी फुटबोर्डवर उभे होते. यापैकी काही प्रवाशांच्या खांद्याला बॅगा लावल्या होत्या. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने हे प्रवासी ट्रेनमधून बाहेर आले होते. या दोन्ही लोकल ट्रेन एकमेकांच्या बाजूने जात असताना त्या वेगात होत्या. यावेळी काही प्रवाशांच्या बॅगचा धक्का दुसऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांना लागला आणि फुटबोर्डवर काही इंच अंतरात पाय ठेवून उभे असलेले प्रवासी ट्रेनमधून खाली पडले, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली. हा अपघात साडेनऊ वाजता घडला. त्यानंतर 9.50 पर्यंत या प्रवाशांना रुग्णावाहिका आणून रुग्णालयात नेण्यात आले, अशी माहितीही मध्य रेल्वेच्या जनसंर्पक अधिकाऱ्यांनी दिली

या अपघातानंतर मध्य रेल्वेने आता भविष्यात ऑटोमॅटिक डोअरच्या गाड्या आणण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर असेल. यामध्ये नव्या 238 गाड्यांचा आणि एसी लोकलचा समावेश असेल. तसेच सध्याच्या लोकल ट्रेनलाही दरवाजे लावण्याबाबतही विचार केला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली. हा अपघात घडला तेव्हा दोन्ही लोकल ट्रकमधले अंतर दीड ते दोन मिटर इतके होते, अशी माहिती एका जखमी प्रवाशाने दिली.

Central Railway: अपघातानंतर मध्य रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय

1. नवीन गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर असेल.

2. सध्याच्या लोकल ट्रेन्सनाही ऑटोमेटिक डोअर लावण्यासंदर्भात विचार केला जाईल.

3. कल्याण कसारापर्यंत तिसरी आणि चौथी  लाईन प्लान केली आहे. कुर्लापर्यंत आपण पाचवी आणि सहावी लाईन प्लॅन केलेली आहे.

4. ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार आहोत

5. कार्यालयांना देखील विनंती केली होती की, वेळेचे फरक केले तर चांगलं होईल.  काहींना आपण स्टॅगर्ट टाइमिंगसाठी कार्यालयांची विनंती आपण केली होती… ज्यात सकाळी १०, १०३०, ११ अशी कार्यालयीन वेळ केली तर अडचण येणार नाही

6. पश्चिम आणि मध्य मध्ये अनेक गोष्टी वेगळ्या आहेत. मध्य रेल्वेची फ्रिक्वेन्सी अधिक आहेत, ब्रिज आणि टनेल अधिक आहेत मध्य रेल्वेवर त्यामुळे कम्पॅरिझन करणं बरोबर होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button