योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह!!रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता ?
प्रतिनिधी योद्धा एक्सप्रेस न्यूज

═━═━═━═━═━═━═━═━═━═━═
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता ?
═━═━═━═━═━═━═━═━═━═━═
१)* हेल्मेट न घातल्यास.. दंड १,०००/-
२)* नो-पार्किंग मध्ये वाहन.. दंड ३,०००/-
३)* विमा नसल्यास.. दंड १,०००/-
४)* दारू पिऊन गाडी चालवल्यास.. दंड १०,०००/-
५)* नो-एंट्री मध्ये गाडी असल्यास.. दंड ५,०००/-
६)* गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास.. दंड २,०००/-
७)* प्रदूषण प्रमाणपत्र नसल्यास.. दंड १,१००/-
८)* दुचाकीवर तीन जण असल्यास.. दंड २,०००/-
मात्र..
१)* ट्रॅफिक सिग्नल नीट नसल्याने अपघात झाल्यास, जबाबदार कोणीच नाही.
२)* रस्त्यात खड्डे असल्यास, जबाबदार कोणीच नाही.
३)* पादचारी मार्गावर अतिक्रमण झाल्यास, जबाबदार कोणीच नाही.
४)* रस्त्यावर लाईट नसल्यास, जबाबदार कोणीच नाही.
५)* रस्त्यावर कचरा असल्यास, जबाबदार कोणीच नाही.
६)* रस्त्याच्या कडेला लाईटचे खांबच नाहीत, जबाबदार कोणीच नाही.
७)* रस्ते खोदून तसेच सोडल्यास, जबाबदार कोणीच नाही.
८)* एखादा खड्ड्यात पडून कुणी जखमी झाला, तर जबाबदार कोणीच नाही.
९)* जर गाडीला भटक्या गायी, जनावरे धडकली किंवा कुत्र्यानं चावलं, तरी जबाबदार कोणीच नाही.
१०)* गटाराचं पाणी रस्त्यावर वाहत असेल, तरी जबाबदार कोणीच नाही.
असं वाटतं की जणू सर्व गुन्हे हे फक्त सामान्य माणूसच करतो आणि फक्त त्यालाच दंड भरावा लागतो. प्रशासन, महापालिका, सरकार यांना कधीच जबाबदार धरलं जात नाही. कायदे फक्त नागरिकांसाठीच आहेत. सरकारी निष्काळजी पणासाठी कुणालाच जबाबदार धरलं जात नाही. आपल्यालाच मेहनत करायची, त्रास सहन करायचा, कर भरायचा, दंड भरायचा, सरकारी खजिना भरायचा. आता हे कुठे तरी थांबलंच पाहिजे.