उद्योग विश्वमाहिती तंत्रज्ञानसामाजिक

योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह!! घराच्या छतावर लटकून सुरू होतं सापांचं मिलन; अचानक एकानं खाली कोसळताच काढला फणा अन्.; अंगावर काटा आणणारा VIDEO

प्रतिनिधी योद्धा एक्सप्रेस न्यूज नासिक

Snake Mating Viral video : सापांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे शिकारीचे, तर कधी लढाईचे, तर काही फारच थक्क करणारे असतात. त्यात आता सापांच्या मिलनाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात सापांची जोडी चक्क एका घराच्या छताबाहेर लटकून मिलनात मग्न असल्याचे दिसतेय. हे दृश्य पाहतानाही तुमच्या अंगावर काटा येईल

व्हिडीओमध्ये एका घराच्या छतावर दोन साप एकमेकांभोवती गुंडाळलेल्या अवस्थेत दिसतायत. हे दृश्य इतकं आकर्षक आहे की, ते पाहून लोक थक्क होत आहेत. छताच्या कडेला लटकत सापांची ही जोडी प्रेमात मग्न असल्याचे दिसून येते

सापांची एकमेकांबाबत प्रेम व्यक्त करण्याची भाषा

*व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मिलनात मग्न असलेली सापांची जोडी एका घराच्या छतातून बाहेर येताना दिसतेय. त्यानंतर दोन्ही साप एकमेकांभोवती विळखा घालत काही सेकंद छताला तसेच लटकून राहतात. हे दृश्य पाहताना असं वाटतं की, दोघं एकमेकांशी लढाई करतायत; मात्र हे त्यांचं नैसर्गिक मिलन आहे. याचदरम्यान त्या जोडीतील एक साप खाली झुडपात कोसळतो; पण तो झुडपातून लगेच बाहेर येत फणा काढून लटकलेल्या सापाकडे पाहू लागतो. ही बहुधा त्यांची एकमेकांबाबत प्रेम व्यक्त करण्याची भाषा असावी. त्यानंतर लटकणारा सापही पुन्हा छतातील एका कोपऱ्यात जाऊन लपतो*.

सापाच्या मिलनाचा हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. काही लोक याला निसर्गाचा एक अनोखा चमत्कार असल्याचे म्हणत आहेत. तर, काही जण याला शुभ संकेत असल्याचे म्हणतायत. कारण- भारतीय संस्कृतीत सापाची जोडी पाहणं हे बहुतेकदा समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं

It’s official, I’m never coming to Australia pic.twitter.com/PwxGx8icAI

— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) August 2, 2025

काही लोकांनी या व्हिडीओला भयानकदेखील म्हटले आहे. कारण- घराच्या छतावर अशा प्रकारे दोन साप लटकताना दिसणं हे खरंच फार धक्कादायक आहे
योद्धा एक्सप्रेस न्युज लाईव्ह नाशिक

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button